शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार
शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार
जउळका रेल्वे प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पॅनल ( Msp) तर्फे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक श्री शरद दत्तराव देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला
श्री शरद देशमुख यांनी ज्ञानयात्री तंत्रस्नेही शैक्षणिक स्थळाची निर्मिती करून त्याद्वारे विविध व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सातत्याने दररोज न चुकता राबवले यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम दररोज विविध प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून वर्षभर राबवत आहे. तसेच गाथा बलिदानाची, शिकु आनंदे, गोष्टीचा शनिवार, विज्ञानाचा गुरुवार दिनविशेष चाचणी व्हाट्सअप स्वाध्याय ई लायब्ररी थँक्स फॉर टीचर या व अशा अनेक उपक्रमाद्वारे शैक्षणिक स्थळ अद्यावत ठेवून याद्वारे लाखो शिक्षक विद्यार्थी व पालकांपर्यंत घराघरात पोहोचले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यादृष्टीने विविध स्पर्धेचे आयोजन निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा काव्य स्पर्धा त्यांचे सुद्धा ऑनलाईन आयोजन केले.
वरील सर्व कार्याची दखल महाराष्ट्र शिक्षक पॅनलने घेऊन दिनांक 15 मे 2022 रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे या ठिकाणी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व साहित्यिक डॉ.निशिगंधा वाढ यांच्या हस्ते तसेच मा आमदार विक्रम काळे साहेब व पदवीधर आमदार मा. सुधीर तांबे साहेब यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या शैक्षणिक कार्याकरिता मार्गदर्शन व प्रेरित करण्याचे काम मा. शिक्षक आमदार तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार अँड.किरणराव सरनाईक साहेब तसेच श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा.सौ अनिताताई सरनाईक, संस्थेचे उपाध्यक्ष श्री लाव्हरे सर, प्राचार्य श्री अरुणदादा सरनाईक तसेच श्री शिवाजी किड्स चे अध्यक्ष मा. श्री स्नेहदिपभैय्या सरनाईक यांनी केले तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल वरील सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME