पुरातन वास्तू लिंबी बारव पासून जाणाऱ्या जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करावी-प्रकाश नागरे भाजपा ता.सरचिटणीस
पुरातन वास्तू लिंबी बारव पासून जाणाऱ्या जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करावी-प्रकाश नागरे भाजपा ता.सरचिटणी
लोणार (युगनायक न्युज नेटवर्क )
लोणार शहर विकास आराखड्यातील पुरातन विभागाची वास्तू लिंबी बारव पासून जाणारा 33 फूट रुंद जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता पर्यटकांसाठी खुला करावा अशी तक्रार दिनांक 21/4/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे केली आहे. तक्रारीत असे नमूद केले आहे की लोणार नगर पलिका हद्दीतील सर्वे नं,218/1-219 मधून जाणारी जुनी पांग्रा पांदण ही पांग्रा,टिटवी,धाड,रायगाव,पुढे मराठवाड्यातील अनेक गावांना जोडणारा रस्ता होता,आजही लोणार नगर पलिका हद्दीत पांदण वापरात आहे,तसेच मंठा बायपास वरून लिंबी बारव कडे
रस्ता कायम आहे,परंतु सर्वे नं. 219 मध्ये मंठा बायपास जवळ सदर रस्त्यात सौ.वनमाला मुक्ताजी सोनुने यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे त्यामुळे सदर पांदण रस्ता हा अरुंद झाला आहे,तसेच लिंबी बारव पासून 100 मीटर अंतरावर दुसरे अनाधिकृत बांधकाम मुक्ताजी लक्ष्मण सोनुने यांनी गोडाऊन चे बांधकाम करून सम्पूर्ण पांदण रस्ता हा स्वतःच्या ताब्यात घेतला आहे,सदर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हे खरोखरच लोणार विकासाला अडथळा निर्माण करणारे ठरत आहे.सोनुने दाम्पत्याने केलेले अतिक्रमण तात्काळ पाडून अतिक्रमण धारक मुक्ताजी लक्ष्मण सोनुने तसेच वनमाला मुक्ताजी सोनुने व इतर अतिक्रमण धारकांवर कडक करावी,अशी तक्रार,भाजपा ता.सरचिटणीस लोणार प्रकाश नागरे यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME