साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी -अभंग शिंदे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी -अभंग शिंदे
नवी मुंबई ठाणे (विशेष प्रतिनिधी )
जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग शिंदे यांच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्यात यावे व अध्यक्षाची निवड करण्यात यावी या मागणीचे पत्र देण्यात आले.मातंग समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे सुरू करण्यात आले आहे.परंतु गेली मागील सात वर्षा पासून महामंडळ हे बंद आहे.
मातंग समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेले महामंडळ हे बंद पडण्याच्या स्थितीत असून.महामंडळास कोणत्याही प्रकारचा निधी हा मागील व आताच्या सरकारने दिलेला नाही.फक्त आश्वासन देऊन मातंग समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे.असे आता समाज बांधवांना वाटू लागलेले आहे.
म्हणून मा.मुख्यमंत्री मंत्री साहेब यांना विनंती करण्यात आली आहे.की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर अध्यक्ष यांची निवड करून महामंडळास १००० कोटीच्या निधीची तरतूद करावी.व विविध सकारात्मक योजनासाठी ज्या ज्या बँकेच्या मार्फत कर्ज दिले जातात.त्या बँकांना समाजबांधवांना कर्ज देण्याच्या सूचना करण्यात याव्यात.अशी मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME