शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा
शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांची दलांलामार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने विविध सेवा उपलब्ध करु...