शासकीय रक्तकेंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे ‘ रक्तदाता दिवस ‘’ उत्साहात साजरा
शासकीय रक्तकेंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे ‘ रक्तदाता दिवस ‘’ उत्साहात साजरा
वाशिम : (युगनायक न्यूज नेटवर्क )वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘ शासकीय सक्तकेंद्र ‘ येथे आज 14 /06/2022 रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ व्ही टी काळबांडे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सी के यादव , बालरोगतज्ञ बी एस थोरात , त्रिरोगतज्ञ डॉ शैख , संत निरंकरी मिशन चे अध्यक्ष एम अंभोरे , ऊयाशीम रक्त केंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे व रक्त संक्रमण अधिकारी डॉ हरीदास मुंडे हे उपस्थित होते . या कार्यक्रमात कार्ल लांड्स्टीनर ( Father of Transfusion Medicine) यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यत आली .
या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व रक्तदान शिबीर आयोजकांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन शासकीय रक्त केंद्र मार्फत सत्कार करण्यात आला. रक्त केंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे यांनी सर्व उपस्थिताना रक्त दान करण्याची शपथ दिली. वाशिम जिल्हामध्ये रक्त संकलन फार कमी आहे व रक्ताची मागणी खूप आहे म्हणून समाजातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान शिबीर आयोजन करून अथवा प प्रत्यक्ष रक्तकेंद्र मध्ये येऊन रक्तदान करण्याची काळाची गरज आहे आहे रक्त केंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे यांनी सांगितले. सासकीय रक्त केंद्रामार्फत दररोज 25-30 रक्त पिशव्यांची पूर्तता वाशिम जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात येते . यामध्ये sickle cell , thallasemia major , Anemia ग्रस्त गर्भवती महिला या सर्वांना रक्तपुरवठा करण्यात येतो. परंतु रक्तसकलन फार कमी असल्यामुळे ( वार्षिक 2500-3000) रक्तकेंद्राला गरजेच्या वेळी रक्तपुरवठा करणे शक्य होत नाही त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक रक्त दात्याने स्वईछेणे मानवतेच्या सेवेने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी जोपासून आपली रक्तदाता म्हणून नोंदणी करावी व जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णाचे प्राण वाचवावेत असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ हरीदास मुंडे यांनी केले .
या कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिर येथील 25 पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केलेले श्री जी वी भारसकर यांचा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सी के यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यत आला . याचसोबत मोफत रक्तगट तपासणी व रक्तदाता नोडणी शिबीर याचे आयोजन देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेले होते . या कार्यक्रमास वाशिम जिल्ह्यातील सर्व शिबीर आयोजक उपस्थित होते व सर्वाचा शासकीय रक्तकेंद्रा मार्फत सत्कार करून रक्तदान चळवळ आणखी सदृढ करण्याचे आवाहन करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आधारप्रदर्शन श्री देवळे यांनी केले . या कार्यक्रमासाठी शासकीय रक्तकेंद्र मधील रक्तकेंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे व रक्त संक्रमण अधिकारी डॉ हरीदास मुंडे , रक्त पेढी तंत्रज्ञ श्री एस फुके, एस मोरे , श्रीमती एस डाखोरे , श्रीमती एस जाधव , श्रीमती टी साब्दे , अधिकारीचारिका ए इंगळे , जनसंपर्क अधिकारी एस दांडे रक्त केंद्र परिचर एल काळे व सोनटक्के यांची मोलाची साथ लाभली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME