जिल्ह्यातील ३५ युवतींकरीता उद्योजकता विकास अंतर्गत महिला टेलरिंग चे मोफत प्रशिक्षण
जिल्ह्यातील ३५ युवतींकरीता उद्योजकता विकास अंतर्गत महिला टेलरिंग चे मोफत प्रशिक्षण
नांदेड: (युगनायक न्यूज नेटवर्क )येथे कार्यरत असलेल्या भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), नांदेड येथे दिनांक ०१.०६.२०२२ पासून ३०.०६.२०२२ या कालावधीत ३० दिवसीय 'महिला टेलर' प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा उदघाटन कार्यक्रम गजानन पातेवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान नांदेड तसेच राम भलावी, संचालक, भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड, अतिष गायकवाड, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती नांदेड, प्रियंका चव्हाण, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती, हदगाव, हिमायतनगर, बालाजी गिरी, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती मुखेड, देगलूर, आशिष राऊत, फॅकल्टी, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड, विश्वास हट्टेकर, फॅकल्टी, आरसेटी नांदेड तसेच ३५ प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून पार पडला, या प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील १८ ते ४५ वयोगटातील ३५ युवती लाभ घेत असून सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास अंतर्गत उद्योजकीय सक्षमता, कार्य प्रेरणा, स्वयं रोजगाराचे फायदे, ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक गुण, सकारात्मक दृष्टीकोन, संभाषण कौशल्य, वेळेचे नियोजन, बँकिंग, प्रकल्प अहवाल, मार्केट सर्व्हे, क्षेत्र भेट, आर्थिक साक्षरता, सरल इंग्रजी तसेच बेसिक संगणक ज्ञान, शासकीय योजना, सामाजिक सुरक्षा योजना इत्यादी आणि शिवणकला अंतर्गत विविध विषयाचे सविस्तर बाबींबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी द्वारा मोफत आयोजित करण्यात आला आहे आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची निवास आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा मोफत करण्यात आली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आशिष राऊत व विश्वास हट्टेकर, फॅकल्टी, आरसेटी नांदेड आणि ज्योती वांगजे यांना तज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. उदघाटनपर मार्गदर्शनामध्ये मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तसेच सदर मोफत प्रशिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये उपजीविका निर्माण करण्याकरिता उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. उमेद अभियान आणि आरसेटी सदैव आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये शिवणकाम, पापड, लोणचे, मसाला बनविणे, कागदी लिफाफे, फाईल व बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय व गांडूळखत निर्मिती, मशरूम कल्टीवेशन, रेशीम शेती, मोबाईल दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती, शिवणकाम, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. यासर्व प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन राम भलावी, संचालक, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वियेतेकरीता आरसेटी कर्मचारी रुनिता अर्ध्यापुरकर, अभिजित पाथरीकर, मारोती कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME