कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त रिठद येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त रिठद येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रिसोड. (युगनायक न्यूज नेटवर्क ) दि. १०जुन रोजी रिठद येथील आंबेडकरी चाळवळीतील युवा नेतृत्व कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त युग गुरु बहु. शिक्षण संस्था, रिठद च्या वतीने रिठद येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण करून कल्पेश कोंडूजी अंभोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करिता भारतीय रोपट्याचा पुरवठा केला त्यात प्रामुख्याने पिंपळ , वड, कडुलिंब, बेल, उंबर, आणि बदाम या रोपट्याचा समावेश आहे या वृक्षारोपण करिता दैनिक संवाद युगनायकांचा या वृत्तपत्राचे मुख्यसंपादक ऍड. भारत गवळी (अध्यक्ष.-युग गुरु बहु. शिक्षण संस्था, रिठद ), उपसंपादक, सुरेश अंभोरे, उपस्थित होते. वृक्षारोपण संदर्भात कल्पेश अंभोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना वृक्ष हे मानव उत्क्रांती अगोदर निर्माण झालेली पहिली सजीव गोष्ट आहे. जी काळानुसार लोप पावत असुन त्याचा परिणाम आज मानव प्रजातीवर पडताना दिसुन येतो. याला कारण हा फक्त आणि फक्त माणूस आहे त्यामुळे आपण या बदलत्या निसर्गाचा समतोल हा वृक्षारोपण करूनच नियंत्रणात आणु शकतो त्यासाठी त्यांनी युवा पिढीला आवाहन केले की आजच्या प्रत्येक युवकांनी धाब्यावर दारू, मटण सारख्या पार्ट्या न करता वृक्षारोपणावर खर्च करा व्हाट्सअप, फेसबुक वर ज्या प्रमाणे मित्राचा ग्रुप तयार करता त्या प्रमाणे गावागावात असलेल्या ई - क्लास जमिनीवर वृक्षारोपण करून घनदाट जंगले तयार करा कारण याच जंगलाचा उपयोग हा मानवहितासाठी होईल . असा मोलाचा सल्ला कल्पेश अंभोरे यांनी युवकांना दिला. यावर संस्थेचे अध्यक्ष. ऍड. भारत गवळी यांचे मनोगत व्यक्त केले की मागील काही वर्षा पासून यांनी निसर्गाचा ऱ्हास होतांना दिसुन येतो याला कारणीभूत हा प्रामुख्याने मानव ठरत आहे कारण विकासाच्या नावावर जंगले कापली जात आहेत. शेतकरी हा उत्पादन वाढीसाठी स्वतः च्या शेतातील वृक्षतोड करतांना दिसुन येतो. पण त्याला आज रोजी हे कळत नाही की जमिनीची उत्पादन क्षमता जरी वाढली तरी निसर्ग आज साथ देत नाही १२ ही महिने अवकाळी पाऊस येतोय, वातावरणात अचानक बदल होत आहेत जे शेतातील पिकाच्या हिताचे नाहीत या मुळे आपलीच हानी होत आहे हे या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या शर्यतीत धावताना दिसुन येत नाही. आज शेतकऱ्यांनी शेताच्या धुऱ्यावर झाड लावायला जागा ठेवली नाही. हिच मोठी शोकांतिका आहे फक्त "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे "एवढे म्हणून चालणार नाही कारण हे वृक्ष आपले सोयरे नसुन यांच्या मुळे आपण प्रत्येक क्षण जगत आहो. त्यामुळे यांना जपणे आपले कर्तव्य आहे. या कार्यक्रमाला दत्तराव गवळी, कोंडजी अंभोरे,रेखाबाई कोंडजी अंभोरे, निकिता विष्णु अंभोरे,हनुमान गवळी , जितेश गायकवाड, विष्णु अंभोरे, अजय ताजने, गजानन जुमडे, शिवाजीराव आरु , मंगेश अंभोरे आणि बहुसंख्य युवा वर्ग उपस्थित होता.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME