कृषी विद्यार्थ्यांचे डाळ गिरणीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न
कृषी विद्यार्थ्यांचे डाळ गिरणीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न
पातूर : (युगनायक न्यूज नेटवर्क )डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला ( अंधारे ) येथील विद्यार्थी तौसिफ शेख, राज शिरसाट यांनी ग्रामीण कृषी व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खानापूर (पातूर) येथील श्री गजानन ऍग्रो डाळ गिरणी येथे नुकतीच भेट देऊन मार्गदर्शन केले . तेथील कामकाज आणि कार्यप्रणाली, कामगार कशाप्रकारे काम करतात व तेथील कर्मचारी कशाप्रकारे मशीन चालवतात हे त्यांनी जाणून घेतले . उपस्थित कामगार आणि मालक यांच्याशी संवाद साधला . शेतीसोबत जोडधंदा सुरू करून कामगार सक्षम होतील , असे मत कृषी विद्यार्थी तौसिफ शेख यांनी यावेळी व्यक्त केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.पी. खरडे , कार्यक्रम समन्वयक प्रा . एस . टी . कव्हर , कार्यक्रम अधिकारी प्रा . पी.ए. देशमुख व विषय तज्ज्ञ प्रा . एस . ए . खवणे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME