महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा वाशिम च्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम चा पाठिंबा

 महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा वाशिम च्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम चा पाठिंबा





वाशीम. (युगनायाक न्यूज नेटवर्क )गत सहा दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामान्य रुग्णालयासमोर आंदोलन सुरू आहे.अद्याप पर्यंत शासनाने याची साधी दखल सुद्धा घेतली  नाही.यापूर्वी सुद्धा आंदोलना दरम्यान आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे साहेबांनी मागण्या पूर्ण करण्यासंबंधी लेखी आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने वंचित बहुजन आघाडी वाशिम च्या वतीने प्रदेश सदस्य सौ. किरणताई गि-हे ,जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे तथा तालुका उपाध्यक्ष विष्णू सरकटे व अनेक पदाधिकाऱ्यांनी  आंदोलना ला भेट दिली .व पक्षाच्या वतीने खंबीर पाठिंबा जाहीर केला .आंदोलन कर्त्यांसोबत सखोल चर्चा केली .यात पदोन्नती,पदनिर्मिती, पदभरती कायमस्वरूपी करण्यात यावी,महागाई भत्ता केंद्रप्रमाणे द्यावा,गणवेश भत्ता द्यावा.वयक्तिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी पदनामात बदल करावा.केंद्राप्रमाणे वेतनवाढी द्याव्या.अर्जित रजा 300 पेक्षा जास्त झाल्यास त्या रद्द न करता पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी.तज्ञ परिसेविकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हते नुसार काम द्यावे.परीचारिकांना निवासस्थाने मिळावी.राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात पाळणा घर उपलब्ध करून द्यावे.सार्वजनिक आरोग्य विभागात राज्य शुश्रूषा सेल स्थापन करावे.विध्यार्थी परीचारिकांचे विद्यावेतन वाढवावे.या प्रमुख मागण्या आंदोलन सामान्य रुग्णालयात सुरू आहे. याआंदोलनाचा फटका गरीब रुग्णास बसत आहे या उपोषणामुळे कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियापुढे ढकलण्यात आल्या व ज्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया आहेत त्यांचा लाभ गरजवंतांना मिळत नसून त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावं लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णान्ना याचा आर्थिक व सामाजिक फटका बसत आहे.एकी कडे परिचारिका हे फ्रंट लाईन वरकर्स मध्ये मोडतात. कोरोना च्या काळात स्वताच्या कुटुंबाची परवा न करता जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवले.त्यात काय एक कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परंतु त्यांच्या मूलभूत सुविधा अजून पर्यंत शासनाने पूर्ण केल्या नाहीत.शासनाने या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास वंचित बहुजन आघाडी वाशिम आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पाठिंबा दरम्यान शासनास देण्यात आला.या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू