जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण -राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश वाशीमच्या चिमुकल्यांचा उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण -राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश वाशीमच्या चिमुकल्यांचा उपक्रम
वाशीम : (युगनायक न्यूज नेटवर्क )प्रदूषणाचा भस्मासुर पृथ्वीला गिळू पाहत आहे .प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिनाचे औचित्य साधून स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिम येथे निसर्ग इको क्लब च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे होत्या त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांनी यावेळी पर्यावरणाच्या व समाजाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन कसे महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरितसेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले .वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग ईकोक्लबचे चिमुकले नेहा वानखेडे, आरती वाझूळकर, रिझा हुसेन, दिशा अग्रवाल, विदुला वाघ, अनुष्का कावरखे, खुशी चौधरी, पिया सरवदे, सरगम सोनोने, ओम नागलुकर, यशराज आरू व शाळेतील माळी विशाल भंगी यांनी मोलाचे सहकार्य केले .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME