जागतिक रक्तदान दिनानिमित्त ( 14 जुन ) शासकीय रक्तकेंद्र तर्फे जनतेस आवाहन


जागतिक रक्तदान दिनानिमित्त  ( 14 जुन )  शासकीय रक्तकेंद्र तर्फे जनतेस आवाहनl


      वाशिम. (युगनायक न्यूज नेटवर्क )शासकीय रक्त केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम तर्फे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील सरकारी व  खाजगी रुग्णालयांना मोफत  रक्तपुरवठा केला जातो . आपल्या शासकीय रक्त केंद्राचे वार्षिक रक्त संकलन  केवळ 2500-3000  एवढेच आहे . या  रक्त केंद्रामार्फत  वाशिम जिल्ह्यातील सर्व  sickle cell , thallasemia ग्रस्त मुले , गरोदर माता/भगिनी , Anemia ग्रस्त रुग्ण व Accident  झालेल्या रुग्णांना मोफत ( Donor card वर)  रक्त पुरवठा करण्यात येतो त्यामुळे प्रत्येक दिवसाला  20-25 रक्त पिशव्यांची मागणी शासकीय रक्तपेढीला येते . 

         परंतु जिल्ह्याकरिता स्वतंत्र शासकीय रक्तकेंद्राची स्थापना होऊन देखील गेल्या १२  वर्षापासून  पुरेश्या प्रमाणात ऐच्छिक  रक्तदात्याकडून   रक्त संकलन  होत नाही.त्यामुळे जास्तीत जास्त तरुण (१८ ते ५५ वर्षं) वयोगटातील व्यक्तींनी स्वइच्छेने रक्तदन करण्यासाठी नोदणी  करणे गरजेचे आहे.जेणे करून रक्तपिशव्याच्या वाढत्या मागणीची पूर्तता केली जाईल. 

         दरवर्षी “१४ जुन हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून उत्साहात साजरा केला जातो.    यावर्षीचे (२०२२) जागतिक रक्तदाता दिवसाचे घोषवाक्य “रक्तदान हे एकजुटीचे कार्य आहे,या प्रयत्नात  सहभागी व्हा आणि जीव वाचवा” असे आहे.या दिनानिमित्त आपल्या शासकीय रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय  वाशिम येथे रक्तदान शिबीर आयोजकांचे मागील २०२१ - २०२२ मध्ये केलेल्या रक्तदान शिबिराकरिता शिबिरा आयोजकांचे आभार/सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.त्याच सोबत सर्व सामान्य नागरिकाना त्यांचा कोणता रक्तगट आहे याची मोफत  तपासणी करण्यासाठी १४ जुन २०२२ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे व  ऐच्छिक निस्वार्थपणे / विनामोबादला रक्तदात्यांचे नोदणी  शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराला वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे आयोजित शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तकेंद्रास सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक -डॉ.व्ही.टी.काळबांडे,

अति जिल्हा शल्य चिकित्सक – डॉ.सी.के.यादव,डॉ.डी.बी.खेळकर ,रक्तपेढी प्रमुख –डॉ.पी.एम.मोरे ,रक्त संक्रमण अधिकारी –डॉ.एच.एस.मुंडे व जनसंपर्क अधिकारी-श्री एस.के.दंडे यानी केले आहे.

 

रक्तदान कोण करू शकतो

प्रतेक निरोगी व्यक्ति रक्तदान करू शकतो /ज्याचे

 

१.वय वर्ष १८ ते ६५  वर्षातील व्यक्ति ज्यांचे Hb (हिमोग्लोबिनचे प्रमान) १२.५ च्या वर आहे 

२.ज्यांचे  वजन ४५ Kg च्या वर आहे. 

३.प्रतेक तीन महिन्यांनी रक्तदान करता येते. 

४.रक्तदाब १००-१४०/६०-९० mmHG 

 

रक्तदान केल्याचे फायदे

१.   रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला एक राज्य रक्त संक्रमण परिषदेअंतर्गत रक्तदाता कार्ड (Donor card) व प्रमाणपत्र देण्यात येते.ज्याचा उपयोग त्यांच्या जवळच्या नातेवाईक,मित्र परिवारास गरजेचे वेळी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय रक्तकेंद्रामध्ये ०२ वर्षापर्यंत अगदी मोफत ०१ रक्तपिशवी मिळू शकते.  

२.   रक्तदान केल्यामुळे रक्तदात्याला निरोगी रहण्यास मदत होते. 

३.   रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त धोकादायक लोह (Iron) ची पातळी कमी होण्यास मदत होते. 

४.   रक्तदान केल्यामुळे हदयरोग होण्याची शक्यता कमी होते. 

५.   रक्तदान केल्यामुळे मानसिक समाधान मिळते. 

 

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू