अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने प्रा.डॉ. सुभाष राऊत यांचा सहृदय सत्कार

 अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने प्रा.डॉ. सुभाष राऊत यांचा सहृदय सत्कार



 चिखली :(युगनायक न्यूज नेटवर्क )दि. 10 जून  2022   बुलढाणा जिल्ह्यातील   सर्वपरिचीत प्रा.डॉ.  सुभाष राऊत सर यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा तर्फे इंग्रजी विषयाचे  Ph.D.Guide  पदी नियुक्ती झाल्याबद्दल फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ आणि शैक्षणीक क्षेत्रासाठी भूषणावह असणाऱ्या या कार्याचा कौतुक सोहळा अक्षर साधना साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा‌. बी‌.ए.खरात सर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जून 2022 ला प्रा. डॉ. सुभाष राऊत सर यांचे निवासस्थानी संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे  पूजन करून, प्रा. साबळे सर व प्रा. बी.ए.खरात सर यांनी प्राध्यापक डॉ. सुभाष राऊत यांना शाल  व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. 

प्रा. बी.ए. खरात  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक डॉ.सुभाष राऊत यांना शुभेच्छा देऊन सरांचे कौतुक केले. या छोटेखानी सहृदय सत्कार सोहळ्यात प्रा. साबळे , प्रा .डोंगरदिवे  प्रा.संजय  निकाळजे यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हि.रा. गवई सचिव अक्षर साधना साहित्य संघ चिखली यांनी  केले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षर साधना साहित्य संघाचे कोषाध्यक्ष प्रशांतकुमार डोंगरदिवे यांनी केले. 

आभार प्रदर्शन विजय डोंगरदिवे  यांनी केले. 

या कार्यक्रमाला अक्षर साधना साहित्य संघाचे उपाध्यक्ष भारत जाधव,एस. एस. गवई, सेवानिवृत्त अभियंता एन.  के.  सरदार, मिलिंद भंडारे, प्रा. आनंद साबळे, विशाल खरात, मनोज दाभाडे , शाहीर बापू लंबे, भारत जाधव ,सौ राऊत ताईसह सर्व मान्यवर उपस्थित होते. 


अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने एक भावस्पर्शी सत्कार चिखली नगरीत संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू