Posts

भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी.

Image
  भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी. -विशेष लेख  (युगनायक न्युज नेटवर्क ) स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून त्या घटनेचे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरले असून घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकत दिली आहे. या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालविला जातो याचे दर्शन घडते आणि म्हणून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद इत्यादीपासून संरक्षण देणारी राज्यघटना बाबासाहेबांच्या हातून लिहिली गेली आहे.            भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे, निघत आहे. घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळाले आहेत. भारतीय संविधान हे सर्व खाजगी, सार्वजनिक व मित्र क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. मुलभूत अधिकार, समानता, अनुसूचित जाती-जमाती, जनजाती, धार्मिक, अ...

ठाणे जिल्ह्यातिल दिघ्यात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...!

Image
  ठाणे जिल्ह्यातील  दिघ्यात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...!   मुंबई /ठाणे   (युगनायक  न्युज नेटवर्क )    दिघा विभागात स्थानिक भूमाफिया व शिवसेना माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून होणाऱ्या अनाधिकृत बांधकामा विरोधात भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंग ठाकूर यांच्या माध्यमातून उपोषणा साठी परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर व एम.आय.डी.सी उपअभियंता यांना देण्यात आले आहे. सदर पत्रात ठाकूर यांचे असे म्हणणे आहे की दिघ्यातील शिवसेना माजी लोकप्रतिनिधी हे एम.आय.डी.सी अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून दिघा विभागात अनाधिकृत झोपड्या या कोणत्याही कायद्याला न जुमानता सरहास पणे बांधत आहेत. अनाधिकृत झोपड्या बांधलेले ठिकाण :- ●दिघा यादव नगर नारायण डेरीच्या पाठीमागे २० ते २५ अनाधिकृत झोपड्या या बांधण्यात आले आहेत. ● दिघा यादव नगर शितला तबेल्या जवळ १० ते १५ अनाधिकृत झोपडया या बांधण्यात आले आहेत  ● दिघा गवतेवाडी येथे १५-२०  अनाधिकृत झोपड्या या बांधण्यात आल्या आहेत. तसेच  ठाकूर यांनी म...

वाईन विक्रीच्या निर्णयावर मागवल्या हरकती

Image
 वाईन विक्रीच्या निर्णयावर मागवल्या हरकती मुंबई : राज्य शासन 🍷 सुपर मार्केटमधून वाइन विक्रीला परवानगीबाबत गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत २९ जूनपर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर हा वादग्रस्त निर्णयावर कार्यवाही हाेण्याची शक्यता आहे. या हरकतीनंतर त्यांचा अभ्यास करून नियमातील सुधारणा विचारात घेण्यात येणार असल्याचेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.  🧐 राज्य सरकारने जानेवारीच्या सुरूवातीला निर्णय घेत मोठी किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली हाेती. राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. राज्य सरकारकडून संबंधित अधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे येत अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत यावर जनतेचं मत ऐकून घेऊन ९० दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले हाेते. त्यानंतर अण्णांनी आंदाेलन मागे घेतले.  🙋🏻‍♂️ २९जून पर्यंत हरकती गृह विभागाने काढलेल्या राजपत्रातील हा मसुदा २९ जून २०२२ नंतर विचारात घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी हरकती किंवा सूचना नाेंदवायच...

हिवरापेन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भूमीपूजन संपन्न

Image
  हिवरापेन  येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भूमीपूजन संपन्न     रिसोड :--दिनांक २/४/२०२२ ( भारत कांबळे प्रतिनिधी)                       रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथे. दिनांक २/४/२०२२रोजी.सकाळी १० वाजता. येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमीपूजन व शौचालय भूमीपूजन. जिल्हा परिषद सद्दश सुभाषभाऊ शिंदे यांच्या हस्ते. ग्रामपंचायत संरपच  अनीलभाऊ सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जागेचे पुजन करुन. कुदळ मारुन भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी भारत कांबळे. सुभाष आंभोरे. ग्रा. प. सचिव उमेश शिंदे. हेमंत सावळे. अदी मांन्यवर प्रमुख उपस्थितीत होते. उपस्थित मान्यवरांचा शाल अंगावर पांघरुण सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की. डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे समाजाच्या विविध कार्यक्रमात उपयोगात आनावे. समाजाचे कार्यक्रमात लग्न कार्यात. जयंती कार्यात मंडळासाठी खर्च लागणार नाही. समाजाने एकोप्याने राहुन. शासनाच्या लोक उपयोगी योजना घेऊन आपल्या गावचा विकास घडवावे. असे ते ...

जेष्ठ पत्रकार भारत कांबळे यांचा हिवरापेन येथे सत्कार

Image
जेष्ठ पत्रकार भारत कांबळे यांचा हिवरापेन येथे सत्कार  रिसोड (युगनायक  न्युज नेटवर्क ) हिवरापेन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरा सामाजिक सभागृह भूमीपूजन कार्यक्रमात जि. प. सद्दश सुभाषभाऊ शिंदे भारत कांबळे यांचे स्वागत करताना.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचारा बाबत तीव्र संताप

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचारा बाबत तीव्र संताप  जालना   - (युगनायक न्युज नेटवर्क ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे 28 तारखेला आहे. एन. सी. दाखलं आतापर्यंत हे आरोपी अटक नाहीत तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी आरोपींना अटक करीत नाही आरोपी अंकुश शिंदे शंकर शिंदे इंदुबाई शिंदे या तिघांनी मिळून या महिलेवर अत्याचार करीत आहे तिला रस्त्याने ये-जा करता शिवीगाळ व मारहाण तुला जीव मारून टाकू अशा धमक्यादेत असतात. आज रोजी सदर महिला जालना सामान्य रुग्णालय मध्ये उपचार घेत आहे. जालना जिल्हा संपर्कप्रमुख अमोल खंडाळे जालना जिल्हा अमोल खंडाळे उमेश कुठे रामेश्वर केंद्रे अनिता जाधव दुर्गा मस्के सविता काळे सेक् सलमान छायाबाई गेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अमोल खंडाळे यांच्या निदर्शनास खाली येणाऱ्या काळात मध्ये आंदोलन करणार आहे  महिलेस जो पर्यंत न्याय नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील  यांचे संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील

ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी चांभई येथील रहिवासी असलेले व जगदिश भाऊ मानवतकर यांचे खंदे समर्थक , आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वैभव इंगोले यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.

Image
  ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी चांभई येथील रहिवासी असलेले व जगदिश भाऊ मानवतकर यांचे खंदे समर्थक , आंबेडकर  चळवळीतील कार्यकर्ते वैभव इंगोले यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.           वाशिम    - (युगनायक न्युज नेटवर्क )     वाशिम  जिल्ह्यात अनेक वर्षांपासून चांभई येथील आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते वैभव इंगोले हे तालुका प्रसिद्धीप्रमुख  या पदावर काम करत होते . त्यांनी या संघटनेचे ध्येय धोरणे तालुकामध्ये अनेक खेड्यांमध्ये प्रसारित केले . या संघटनेचे अध्यक्ष जगदिश भाऊ मानवतकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मोहोळ तालुक्यात त्यांचे कार्य बघून या संघटनेचे अध्यक्ष यांनी त्यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त १ एप्रिल २०२२ रोजी रोजी ही नेमणूक करण्यात आली. वैभव इंगोले यांनी अनेक लोकांच्या अडचणी दूर केल्या.तसेच फुले शाहू आंबेडकर साठे ही विचारसरणी मंगरूळपीर च्या प्रत्येक गावात नेऊन ही संघटना बळकट केली.तसेच या संघटनेचे अध्यक्ष जगदिश भाऊ मानवतकर यांचे विचार ते मंगरूळपीर ...

महिलेच्या माहेरच्या संपत्तीवर पती-मुलांचा हक्क आहे का..? दिल्ली हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय..!

Image
  महिलेच्या माहेरच्या संपत्तीवर पती-मुलांचा हक्क आहे का..? दिल्ली हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय..! दिल्ली -(युगनायक  न्युज नेटवर्क ) वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कायद्यात स्पष्ट माहिती दिलीय.. मात्र, अनेकदा या मालमत्तेवरुन वाद होतात. कधी कधी ते इतके विकोपाला जातात, की त्यातून मोठमोठे गुन्हे घडतात.. अगदी जवळचे नातेवाईकही संपत्तीसाठी एकमेकांच्या जिवावर उठल्याचे पाहायला मिळते… वडिलांच्या संपत्तीवर वारसा हक्काने मुलाप्रमाणेच मुलीचाही समान हक्क असतो.. पण मुलीचा मृत्यू झाला असेल तर..? अशा वेळी मुलीच्या पतीला व तिच्या मुलांना आजोळच्या संपत्तीत वाटा मिळू शकतो का..? याबाबत दिल्ली हायकोर्टाने नुकताच महत्वपूर्ण निकाल दिलाय… नेमकं हे काय प्रकरण होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..नेमकं प्रकरण काय..? एका मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीतील एक तृतीयांश भागावर हक्क होता. मात्र, नंतर मुलीचा मृत्यू झाला.. त्यानंतर तिच्या मुलानं आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगितला. मात्र, मामा आपल्या भाच्याला मालमत्तेत हिस्सा देण्यास तयार नव्हता… बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना संपत्तीत हक्क देण्यास त्या...

महागाई मुक्त भारत करण्यासाठी लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डफळे वाजुन केले आंदोलन

Image
  महागाई मुक्त भारत करण्यासाठी लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डफळे वाजुन केले आंदोलन :- महंगाई मुक्त भारत बनाना है तो काँग्रेस को लाना है - युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारि,व राजेश मापारी.  लोणार . प्रा लुकमान कुरैशी        अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदेश नुसार महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन दिनांक 1 एप्रिल2022 रोजी सकाळी 11 वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस  कमिटीच्या वतीने लोणार बस स्थानक समोर गॅस सिलेंडर स्कूटर मोटर सायकल ला सजवून केंद्र सरकारचा महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलेआहे. या  आंदोलनात तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व  कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन हा  तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी,शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले.  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुटा लुट करीतआहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या ...

राशन दुकानदारांनी ई.पि.एस.मशीनसंदर्भात लोणार शहरात रॅली काढून केले आंदोलन....

Image
  राशन दुकानदारांनी ई.पि.एस.मशीनसंदर्भात लोणार शहरात रॅली काढून केले आंदोलन.... लोणार :प्रा लुकमान कुरैशी        संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या राशन वाटपाचे ई.पि.एस.मशीन ची मुदत कालबाह्य झाल्या मुळे गेल्या अनेक महिन्यापासून राशन वाटपासाठी दुकानदारांसह ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुदतबाह्य झालेल्या मशीन ची वेळोवेळी बिघाड होत असून या मशीन मध्ये असणारे सिमकार्ड हे 3 जी नेटवर्क चे असून आता 4 जी सह 5 जी नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले असल्यामुळे या 3 जी सिमकार्ड चे नेटवर्क कमी पडत असल्यामुळे पर्यायाने रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून हॉसपॉट च्या माध्यमातून मशीन कनेक्ट करून चालवाव्या लागत आहे.परंतु त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी ई.पी.एस.मशीन वरील व आधार सीडींग वरील साईड वर सुरू असलेल्या अडचणींना सामना देत राशन दुकानदारांना राशन वाटपासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वेळ प्रसंगी तर बऱ्याच ठिकाणी ग्राहकांसोबत या अडचणीमुळे भांडण सुद्धा होतांना बघावयास मिळत आहेत.       ...

निकोप व निरोगी दात म्हणजे सुदृढ आरोग्याची नांदी होय : डॉ . अनुप सांबापुरे

Image
  निकोप व निरोगी दात म्हणजे सुदृढ आरोग्याची नांदी होय : डॉ . अनुप सांबापुरे                            मालेगाव  प्रतिनिधी / सुरज अवचार निकोप व निरोगी दात म्हणजे खऱ्या अर्थाने सुदृढ आरोग्याची नांदी होय असे उदगार डॉ अनुप सांबापुरे मालेगांव यांनी काढले . ते रामराव झनक महाविद्यालय मालेगावच्या रासेयोच्या दत्तक ग्राम खिर्डा येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरात दंत तपासणी शिबिरात बोलत होते . ते पुढे म्हणाले की प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा शास्त्रोक्त पध्दतीने टुथपेस्ट व टुथ ब्रशने दात स्वच्छ करावे. त्यानंतर त्यांनी दातांच्या विविध समस्यांवर् प्रकाश टाकून त्यावर तोडगा सुचविला .नंतर त्यांनी ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक यांच्या दाताची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिला . जसे, टुथब्रश ' टुथपेस्ट ,औषध , गोळ्या इत्यादी . अध्यक्षीय भाषणात प्रा . नंदकिशोर गायकवाड म्हणाले की दात व स्वास्थ परस्परावलंबीत आहेत . त्यामुळे दातांची नियमित तपासणी करून निगा राखावी व चॉकलेट खाणे टाळावे असा मूलमंत्र प्रा . नंदकिशोर गायकवाड यांनी उ...

भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

Image
  भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर रिसोड   :- (युगनायक  न्युज नेटवर्क )   रिसोड शहर व परिसरातील , सर्व गरजू नेत्र रुग्णांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, आपल्या रिसोड शहरांमध्ये, *स्वर्गीय भगवानराव अर्जुनराव गायकवाड(महागाव) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ*,  संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप, तालुका रिसोड, व लायन्स क्लब रिसोड मीडटाऊन  आणि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर, यांच्या संयुक्त विद्यमाने, भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे, आयोजन दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवार व तपासणी दिनांक ८ एप्रिल २०२२ रोज शुक्रवार ला करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर हे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया उपचार करणार आहेत. तेव्हा या सुवर्ण संधीचा रिसोड शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी, या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती.  या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी संपर्क :  संतोष क्लॉथ सेंटर, सिविल लाईन रिसोड. ...

बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव

Image
  बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव               रिसोड :-   (भारत कांबळे प्रतिनिधी)    (युगनायक  न्युज नेटवर्क ) दिनांक ३१/3/२०२२ रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथील. कतृत्ववान ढगायक व पोलीस पाटील माधव कुंडलीत सावळे. यांचा  जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह  यांचे मार्गदर्शना खाली. सुनील कुमार पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वाशिम. यांचे प्रमुख उपस्थितीत. शिरपुर पोलीस स्टेशचे ठाणेदार  सुनील वानखेडे यांच्या हस्ते शिरपुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला. व शाल अंगावर पांघरूण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना. वाशिम जिल्हा पोलीस दलाने आयोजित करण्यात आलेल्या संगीत संमेलनात आपन सहभागी झालात. आपले गीत केवळ गीत नव्हते. हे आपल्या गायनातून प्रचिती आले. तसेच आपल्या सांगीतिक योगदानामुळे. एकात्मता. बंधुता व आत्मीयता. वृदधिगत होईल. असा विश्वास वाटतो. करीता आपल्या अंतरंगातील सर्जनशील कलावंताचा हे प्रशस्तीपत्र देउन गौरव करीत आहोत. असे बोलताना शि...

आज सोनखास येथे राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन

Image
  आज सोनखास येथे  राज्यस्तरीय धम्म  परिषदेचे आयोजन वाशिम  -(युगनायक  न्युज नेटवर्क ) भारतीय बौद्ध महासभा, आणि पंचशील मित्र मंडळ  सोनखासयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन दि 30 मार्च ला करण्यात आले आहे या कार्यकामाला प्रामुख्याने उपस्थित पूज्य भन्ते डॉ  आनंद राहणार असून त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे  कार्यक्रमाचे  उदघाटक म्हणून डॉ विजयकुमार तुरुकमाने, तर अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ देवरे स्वागताध्यक्ष  डॉ  वैशाली देवळे आणि हरिश्चंद्र पोफळे  (वाशिम जिल्हा संस्कार विभाग प्रमुख भा. बौ. महा. वाशिम असतील  कार्यक्रमाची  सुरवात सोनखास ता. जिल्हा वाशिम येथे सकाळी 9:00 वा ते रात्री 10:00 वा पर्यंत कार्यक्रमाचे  स्वरूप सकाळी 9:00 वा सामूहिक बुद्ध वंदना  आणि  महामानवच्या प्रतिमेचे पूजन ,9:30 वा. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि  सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत धम्मदेशना व्याख्यान दुपारी 2 वा 10 मी. चहा आणि उर्वरित कार्यक्रमाला सुरवात दुपारी 4 वा  अल्प उपहार राहील सायंकाळी 5 वा.ते 8 वा. भ...

धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद संपन्न

Image
  धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद  संपन्न नांदेड -(युगनायक न्यूज नेटवर्क )  सिडको...(दि.27..3.2022)रोजी ,सिडको येथे धम्मसेनानी,सत्यशोधक जी.एस. दादा कांबळे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सिडको येथे जाहिर परिसंवाद आयोजन  करण्यात आले  होते ..प्रथम दादाच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला व जाहीर परिसंवादाला सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे  उदघाटक  पू. भंते पय्याबोधी  थेरो उपस्थित होते कार्यक्रमाचे  सभाध्यक्ष  म्हणून लक्ष्मीकांत शिंदे तर  प्रमुख पाहुणे म्हणून संजय कदम, आयु. रेखा दाभाडे, आनंद हनमंते, गोविंद वाघमारे  डी डी. गायकवाड प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण कांबळे, भीमा वावळे तानाजी शिंदे, रंगनाथ भालेराव, होते तर  प्रमुख वक्ते म्हणून ऍड. बि एम. गायकवाड, आनंद दुधकवडे श्याम कांबळे विश्वनाथ उराडे म्हणून उपस्थित होते जाहीर  परिसंवादाचा विषय "जी.एस.दादा यांचे धम्मचळवळीत योगदान व आजची परिस्थिती" यावर सविस्तर विवेचन व मांडणी अॅड.एल.बीड.इंगळे ( बसपाचे महाराष्टृ प्रदेश सचिव...

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड! झाडांवर लावले जलपात्र :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम

Image
  पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड!  झाडांवर लावले जलपात्र  :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम       वाशीम  -(युगनायक  न्यूज नेटवर्क ): स्थानिक एस एम  सी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्राची उभारणी करण्यात आली  .           सध्या पृथ्वी वरील वाढते तापमान, झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण -यांत्रीकीकरण आणि निसर्गीचा दुष्परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे  .सोबतच रासायनिक कीटकनाशकांच्या व खतांचा अति वापर यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यातच  मोबाईल चे टाँवर, इंटरनेटचा अतिवापर आणि त्यातुन निघणार्‍या लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्येक्षात दिसणारा पक्षी (चिमणी)  आता फक्त लहान मुलांना चित्रातच दिसण्याची वेळ आली आहे  .पक्षी हा निसर्गाचा अतिशय...

संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार

Image
  संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार मालेगांव / सुरज अवचार रासेयो स्वयंसेवकांनी अभ्यासूवृत्ती बाळगुण संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बनण्याचे आवाहन प्रा. यशवंत पवार यांनी केले. ते रामराव झनक कला व वाणिज्य महा विद्यालय मालेगावच्या रासेयो विशेष भ्रमसंस्कार, शिबिर दत्तक ग्राम खिर्डा येथे रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थांना उद्देशून बोलत होते. रासेयोद्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रवीय नात्मक खंजेरी भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकून त्यांना मंत्रमुग्ध केले. ते पुढे म्हणाले की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये एक छोटेसे ग्रंथालय उभारून व वाचनाची आवड अंगी बानुन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाव व युवा पिढीवर व लहान मुलांवर वाचन संस्कार बिंबवावेत त्यानंतर मा. यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते भारत इंगळे, वामनराव इंगळे यांनी संत सेवालाल महाराज, संत गाडगेबाब छ. शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची उद्देशपत्रिका इत्यादींच्या प्रतिमा स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना भेट देवून त्यांना ...

ऑल इंडिया जमीयतुल कुरैश च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही. -- प्रा लुकमान कुरैशी

Image
  ऑल इंडिया जमीयतुल  कुरैश  च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही.  --  प्रा लुकमान कुरैशी मोताळा .( युगनायक न्यूज नेटवर्क ) आज दि.२७.०३.२०२२ रोजी अलफ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे ऑल इंडिया जमियतुल कुरैश  या सामाजिक संघटने चा जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहाने जिल्हा अध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली अल फ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे यशस्वीपणे  पार पडला.सदर मेळ्याव्यात जिल्ह्यातील बह संख्येने मान्यवर उपस्थित होते.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात कुरेशी समाजाच्या समस्या जसे शिक्षण, आरोग्य, लग्न व व्यवसाय बद्दल माहिती सांगण्यात आली.आपण सर्व एकत्रित येऊन ह्यावर उपाययोजना संघटन मार्फत पुर्ण करण्याचा प्रयत्न करु. याच दरम्यान जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.व उर्वरित कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण होईल. जिल्हा उपाध्यक्ष पदावर प्रा हुसेन कुरेशी मोताळा व मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी मेहकर. यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्...

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Image
  भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रिसोड (केशवनगर )  -  (युगनायक  न्युज नेटवर्क ) रमाई महिला संघ केशवनगर येथे दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आज दि. २४ मार्च २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक - संध्याताई पंडित जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, कार्यक्रमाच्या अध्यक्षा- महानंदाताई वाठोरे तालुका अध्यक्ष महिला, शिबिराच्या केंद्रीय शिक्षिका- चंद्रकला मुजमुले मॅडम, शिबिराच्या अध्यक्षा कांताबाई वाघमारे, प्रमुख उपस्थिती- शालिग्राम पठाडे सर तालुका अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा, देविदास सोनुने तालुका सचिव, कैलास सुर्वे तालुका संस्कार प्रमुख, गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख, नितेश नवघरे बोध्दाचार्य, नंदकिशोर मोरे, अजय कांबळे समता सैनिक दल, शिवाजीराव सरनाईक सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी दळवी सरपंच केशवनगर, गजानन बाजड उपसरपंच केशवनगर, भारत खंडारे सर, रवी वाघमारे सर, अशोक वाघमारे सर, प्रभाकर साबळे सर, नितिन डोंगरदिवे ग्रामपंचायत सदस्य, नितिन खंडारे आयोजक व उपस्थित सर्व रमाई महिला संघ केश...

आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..

Image
आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा.. भारतात केंद्र सरकारकडून दुर्बल घटक, महिला आणि इतर काही घटकांच्या विकासासाठी अनके वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. देशभरात शेतकऱ्यांना जसे वर्षाला अनुदान म्हणून प्रत्येकी 6000 रुपये मिळतात. तसेच आता महिलांसाठीही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे देशभरातील अनेक महिलांना आथिर्क लाभ मिळू शकतो. ही मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे. महिलांसाठीच्या या योजनेचं नाव पीएम मातृ वंदन योजना (PMMVY Scheme) असं आहे. *पीएम मातृ वंदन योजनेचे फायदे काय?* भारत हा कृषीप्रधान देश असून अनेक कारणांमुळे देशातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. तसे आता काही गरीब महिलांनाही आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार 6000 रुपये देणार आहे. याचा फायदा देशातील लाखो महिलांना होणार असून या योजनेचा हवा तेवढा प्रसार न झाल्यामुळे अनेक महिला आताही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पीएम मातृ वंदन योजना ही योजना अनेक उपक्रमांतर्गत महिलांपर्यंत पोहोचवत असते. ही योजना केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या...