हिवरापेन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भूमीपूजन संपन्न
हिवरापेन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भूमीपूजन संपन्न
रिसोड:--दिनांक २/४/२०२२( भारत कांबळे प्रतिनिधी) रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथे. दिनांक २/४/२०२२रोजी.सकाळी १० वाजता. येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमीपूजन व शौचालय भूमीपूजन. जिल्हा परिषद सद्दश सुभाषभाऊ शिंदे यांच्या हस्ते. ग्रामपंचायत संरपच अनीलभाऊ सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जागेचे पुजन करुन. कुदळ मारुन भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी भारत कांबळे. सुभाष आंभोरे. ग्रा. प. सचिव उमेश शिंदे. हेमंत सावळे. अदी मांन्यवर प्रमुख उपस्थितीत होते. उपस्थित मान्यवरांचा शाल अंगावर पांघरुण सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की. डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे समाजाच्या विविध कार्यक्रमात उपयोगात आनावे. समाजाचे कार्यक्रमात लग्न कार्यात. जयंती कार्यात मंडळासाठी खर्च लागणार नाही. समाजाने एकोप्याने राहुन. शासनाच्या लोक उपयोगी योजना घेऊन आपल्या गावचा विकास घडवावे. असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित भाषणे केली. सदर कार्यक्रमासाठी अशोक आंभोरे. माधव सुधाकर आंभोरे. कडुभाऊ आंभोरे. उत्तम आंभोरे. माधव आंभोरे. रंगनाथ आंभोरे. कैलास आंभोरे. अदिती परीश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक आभार अशोक आंभोरे यांनी मानले. या वेळी उपासक उपासिका पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून. बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME