महागाई मुक्त भारत करण्यासाठी लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डफळे वाजुन केले आंदोलन
महागाई मुक्त भारत करण्यासाठी लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डफळे वाजुन केले आंदोलन:- महंगाई मुक्त भारत बनाना है तो काँग्रेस को लाना है - युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारि,व राजेश मापारी.
लोणार. प्रा लुकमान कुरैशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदेश नुसार महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन दिनांक 1 एप्रिल2022 रोजी सकाळी 11 वाजता लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणार बस स्थानक समोर गॅस सिलेंडर स्कूटर मोटर सायकल ला सजवून केंद्र सरकारचा महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलेआहे. या आंदोलनात तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी,शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार सातत्याने
महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुटा लुट करीतआहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या
वेळी परभावाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सरकारने रोखुन
धरल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरूवात केली
आहे. मागिल पाच दिवसात पेट्रोल, डिझेल मध्ये दररोज ८० पैशाने वाढतचस सुरू वात झाली ३.२० रूपयाची
वाढ केली तर एलपीजी गॅस सिलेंडर ५० रूपयाने महाग केला असुन तो आता काही ठिकाणी
१ हजार रूपयाच्या वर गेला आहे. यासोबतच सीएनजी आणी पीएनजी गॅसही महाग केला
आहे. तसेच खाद्यतेल व इतर जिवनाश्यक वस्तुंच्या दरातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याने
सर्वसामान्यांचे जगने कटीनच झाले आहे.
इधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, जनतेची खुलेआम लुटालुट सुरू
आहे, पण केंद्रातील सरकार मात्र डोळेझाकुन बसले आहे. जनतेला लुटणा-या सर्वसामन्यांच्या
मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणा-या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवुन
केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी यांनी 'महागाई मुक्त भारत' अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन
करण्याचा निर्णय घेतला आहे.
मा. प्राताध्यक्ष नानाभाउ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या आंदोलनाची धुरा हाती घेऊन या मोदी सरकारच्या महागाई सरकारने दर वाढ कमी केलीच पाहिजे,सामान्य जनतेची लुटथांबवलीस पाहिजे असे कार्य करण्याचे आव्हान काँग्रेस पक्षाने केले आहे,या आंदोलनात काँग्रेस कमिटी लोणार तालुका अध्यक्ष जि. प. सदस्य राजेश मापारी, नगर परिषद गटनेते भूषण मापारी, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष नितीन शिंदे, काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, नगरसेवक आबेद खान, गुलाब सरदार, तोफिक कुरेशी,प्रा.गजानन खरात,शेख रुऊफ, सरपंच गणेश घायाळ, उपसरपंच सतीश राठोड, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भरत राठोड, एन.एस.यु.आय जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद शेख करामत, माजी नगरसेवक अरुण जावळे, शांतीलालजी गुगलीया, अंबादास इंगळे,शेख समद, पंढरी भाऊ चाटे, सोशल मीडिया मोसिन शाह, अकिब कुरेशी,बंडू मापारी, सह सैकड़ों कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME