निकोप व निरोगी दात म्हणजे सुदृढ आरोग्याची नांदी होय : डॉ . अनुप सांबापुरे

 निकोप व निरोगी दात म्हणजे सुदृढ आरोग्याची नांदी होय : डॉ . अनुप सांबापुरे     


                     

मालेगाव प्रतिनिधी / सुरज अवचार


निकोप व निरोगी दात म्हणजे खऱ्या अर्थाने सुदृढ आरोग्याची नांदी होय असे उदगार डॉ अनुप सांबापुरे मालेगांव यांनी काढले . ते रामराव झनक महाविद्यालय मालेगावच्या रासेयोच्या दत्तक ग्राम खिर्डा येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरात दंत तपासणी शिबिरात बोलत होते . ते पुढे म्हणाले की प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा शास्त्रोक्त पध्दतीने टुथपेस्ट व टुथ ब्रशने दात स्वच्छ करावे. त्यानंतर त्यांनी दातांच्या विविध समस्यांवर् प्रकाश टाकून त्यावर तोडगा सुचविला .नंतर त्यांनी ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक यांच्या दाताची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिला . जसे, टुथब्रश ' टुथपेस्ट ,औषध , गोळ्या इत्यादी . अध्यक्षीय भाषणात प्रा . नंदकिशोर गायकवाड म्हणाले की दात व स्वास्थ परस्परावलंबीत आहेत . त्यामुळे दातांची नियमित तपासणी करून निगा राखावी व चॉकलेट खाणे टाळावे असा मूलमंत्र प्रा . नंदकिशोर गायकवाड यांनी उपस्थितांना दिला . प्रास्ताविक भाषणातून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा . डॉ . भिमराव जांभरुणकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली . कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . सर्व मान्यवरांचे स्वागत वटवृक्ष व कडूलिंब वृक्ष देवून करण्यात आले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश सरकटेने तर आभारप्रदर्शन विनोद गव्हाणेने केले . कार्यक्रमाला ग्रामस्थ रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू