वाईन विक्रीच्या निर्णयावर मागवल्या हरकती
वाईन विक्रीच्या निर्णयावर मागवल्या हरकती
मुंबई : राज्य शासन
🍷 सुपर मार्केटमधून वाइन विक्रीला परवानगीबाबत गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत २९ जूनपर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर हा वादग्रस्त निर्णयावर कार्यवाही हाेण्याची शक्यता आहे. या हरकतीनंतर त्यांचा अभ्यास करून नियमातील सुधारणा विचारात घेण्यात येणार असल्याचेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
🧐 राज्य सरकारने जानेवारीच्या सुरूवातीला निर्णय घेत मोठी किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली हाेती. राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. राज्य सरकारकडून संबंधित अधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे येत अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत यावर जनतेचं मत ऐकून घेऊन ९० दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले हाेते. त्यानंतर अण्णांनी आंदाेलन मागे घेतले.
🙋🏻♂️ २९जून पर्यंत हरकती
गृह विभागाने काढलेल्या राजपत्रातील हा मसुदा २९ जून २०२२ नंतर विचारात घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी हरकती किंवा सूचना नाेंदवायच्या आहेत. नागरिकांना हरकतीसाठी dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेलवर अथवा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०००२३ या पत्त्यावर टपालाद्वारे नोंदविता येणार आहेत.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME