राशन दुकानदारांनी ई.पि.एस.मशीनसंदर्भात लोणार शहरात रॅली काढून केले आंदोलन....
राशन दुकानदारांनी ई.पि.एस.मशीनसंदर्भात लोणार शहरात रॅली काढून केले आंदोलन....
लोणार :प्रा लुकमान कुरैशी
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या राशन वाटपाचे ई.पि.एस.मशीन ची मुदत कालबाह्य झाल्या मुळे गेल्या अनेक महिन्यापासून राशन वाटपासाठी दुकानदारांसह ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुदतबाह्य झालेल्या मशीन ची वेळोवेळी बिघाड होत असून या मशीन मध्ये असणारे सिमकार्ड हे 3 जी नेटवर्क चे असून आता 4 जी सह 5 जी नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेले असल्यामुळे या 3 जी सिमकार्ड चे नेटवर्क कमी पडत असल्यामुळे पर्यायाने रास्त भाव दुकानदारांना आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून हॉसपॉट च्या माध्यमातून मशीन कनेक्ट करून चालवाव्या लागत आहे.परंतु त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी ई.पी.एस.मशीन वरील व आधार सीडींग वरील साईड वर सुरू असलेल्या अडचणींना सामना देत राशन दुकानदारांना राशन वाटपासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वेळ प्रसंगी तर बऱ्याच ठिकाणी ग्राहकांसोबत या अडचणीमुळे भांडण सुद्धा होतांना बघावयास मिळत आहेत.
हा सुरू असणारा ग्राहकांना व राशन दुकानदारांना त्रास कमी होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून रास्त भाव दुकानदारांनी याआधी सुद्धा वेळोवेळी प्रशासनाकडे मशीन बदलून मिळण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. परंतु सरकारने त्यावर कुठलाही तोडगा न काढल्यामुळे दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी लोणार तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पंचायत समिती कार्यालयाजवळील हॉल मधून तर थेट तहसील कार्यालय लोणार पर्यंत हातामध्ये राशन वाटपाची ई.पी.एस.मशीन घेऊन आपली पायी दिंडी काढल्याने संपूर्ण लोणार वासियांचे या मोर्चा कडे लक्ष लागले होते.
त्यानंतर तहसील कार्यालय लोणार येथे जाऊन तालुक्यातील उपस्थित सर्व राशन दुकानदारांनी लोणार तहसील चे तहसीलदार सैपान नदाफ यांना निवेदन देऊन आपल्या मशीन जमा करून दिल्या. परंतू तहसीलदार यांनी तोंडी दिलेल्या आश्वासनानंतर दुकानदारांनी आपापल्या मशीन परत घेतल्या.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे, सचिव संजय पवार सह नशिम सर,रामदास तनपुरे, आघाव मामा,प्रमोद मापारी,राजु धुमाळ, नागेश सुपेकर,पिंटू आघाव,रुस्तुम मुळे, सतीश पाटील तेजनकर सह तालुक्यातील बरेच स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME