ठाणे जिल्ह्यातिल दिघ्यात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...!

 ठाणे जिल्ह्यातील दिघ्यात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट...!

 मुंबई /ठाणे   (युगनायक  न्युज नेटवर्क )   

दिघा विभागात स्थानिक भूमाफिया व शिवसेना माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून होणाऱ्या अनाधिकृत बांधकामा विरोधात भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंग ठाकूर यांच्या माध्यमातून उपोषणा साठी परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर व एम.आय.डी.सी उपअभियंता यांना देण्यात आले आहे.

सदर पत्रात ठाकूर यांचे असे म्हणणे आहे की दिघ्यातील शिवसेना माजी लोकप्रतिनिधी हे एम.आय.डी.सी अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून दिघा विभागात अनाधिकृत झोपड्या या कोणत्याही कायद्याला न जुमानता सरहास पणे बांधत आहेत.


अनाधिकृत झोपड्या बांधलेले ठिकाण :-

●दिघा यादव नगर नारायण डेरीच्या पाठीमागे २० ते २५ अनाधिकृत झोपड्या या बांधण्यात आले आहेत.

● दिघा यादव नगर शितला तबेल्या जवळ १० ते १५ अनाधिकृत झोपडया या बांधण्यात आले आहेत

 ● दिघा गवतेवाडी येथे १५-२०  अनाधिकृत झोपड्या या बांधण्यात आल्या आहेत.




तसेच  ठाकूर यांनी मागील वेळेस अनाधिकृत झोपड्या विरोधात एम.आय.डी.सी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.त्या अनुषंगाने तिथे छोटीशी तोडक मोडक कारवाई ही दाखवण्यात आली.तसेच एम.आय.डी.सी नि आपल्या स्वतःचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला होता.परंतु भूमाफिया यांनी कोणत्याही कारवाई ला न जुमानता सदर ठिकाणचा बोर्ड हटवून अधिकारी यांच्याशी संगनमत करून सरहास पणे अनाधिकृत झोपड्या बांधत सुटेल आहेत.त्या अनुषंगाने ठाकूर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त व एम.आय.डी.सी उपअभियंता यांना अशी विनंती केली आहे.की येत्या १० तारखे पर्यत अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई करत.अनाधिकृत झोपड्या बांधणाऱ्या शिवसेना माजी लोकप्रतिनिधी व भूमाफिया यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे नोंदवावे.अन्यथा येत्या १२ एप्रिल पासून  आमरण उपोषण हे करण्यात येईल असे ठाकूर यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.निवेदन देते वेळेस माहिती अधिकार कार्यकर्ते अमित मिश्रा,समाजसेवक दिपक उपाध्याय,समाजसेवक महेश पांडे व जय लहुजी सामाजिक संस्थचे पदाधिकारी योगेश अभंग शिंदे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू