बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे
बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे रिठद येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी रिसोड . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहु.कला, क्रीडा व शिक्षण संस्था,रिठद च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन ऍड. भारत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराव गवळी प्रमुख पाहुणे म्हणून सोपान अंभोरे, आणि सुरेश जयाजी अंभोरे होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती च्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे याच्या साहित्याचा प्रचार प्रसार हा जन सामान्य पर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा कारण आज मराठी माणूस हा भ्रमणध्वनी चा वापर प्रमाणापेक्षा ज्यास्त करत असुन साहित्यापासून दुरावत जात आहे त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीने साहित्यिक व त्यांचे साहित्य जपणे ही काळाची गरज आहे. असे विचार अध्यक्षीय भाषणात विचार मांडले. क...