लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना रिठद येथे विनम्र अभिवादन...!
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना रिठद येथे विनम्र अभिवादन...!
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहु. कला, क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद
रिसोड /रिठद (युगनायक न्यूज नेटवर्क ) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहु. कला क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद च्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहु. कला क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद च्या वतीने कार्यालयात आयोजन करण्यात आले हॊते. कार्यक्रच्या अध्यक्षस्थानी ऍड. भारत गवळीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तराव गवळी,सुरेश अंभोरे, परसराम कांबळे, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी ऍड. भारत गवळीकर यांनी अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करतांना अण्णा साठे यांनी सांगितलेल्या प्रमाणे..........
"जग बदल घालुनी घाव
मज सांगून गेले भीमराव "
यांचा मतितार्थ जो पर्यतं मातंग समाज समजुन घेणार नाही तो पर्यंत समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय विकास होणे शक्य नाही कारण आज महाराष्ट्रातील मातंग समाजातील आर्थिक विकास, शैक्षणिक विकास, राजकीय विकास व सामाजिक विकास हा फक्त 05% इतकाच आहे याची समीक्षा मातंग समाजाने करणे काळाची गरज ठरेलं . त्यासाठी समाजाने अंधश्रद्धा, सोडून वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकरणे गरजेचे आहे. असे अध्यक्षीय भाषणात ऍड भारत गवळीकर बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित कल्पेश अंभोरे, जितेश गायकवाड, अजय ताजने, गजानन जुमडे, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME