बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे

  •  बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक  अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे




रिठद येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

रिसोड.  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  बहु.कला, क्रीडा व शिक्षण संस्था,रिठद च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन ऍड. भारत  गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराव गवळी प्रमुख पाहुणे म्हणून सोपान अंभोरे, आणि सुरेश जयाजी अंभोरे होते यावेळी संस्थेचे  उपाध्यक्ष दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती च्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे याच्या साहित्याचा  प्रचार प्रसार हा जन सामान्य पर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा  कारण आज मराठी माणूस हा भ्रमणध्वनी चा वापर प्रमाणापेक्षा ज्यास्त करत असुन साहित्यापासून दुरावत जात आहे त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीने साहित्यिक व त्यांचे साहित्य जपणे ही काळाची गरज आहे. असे विचार अध्यक्षीय भाषणात विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश जयाजी अंभोरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी सांगताना अण्णा भाऊ साठे आणि साहित्य हे अतुट नातं अण्णा भाऊ साठे यांनी जपलं कारण साहित्य हे त्याचा प्राण च म्हणवा लागेल कुठल्याही वर्गाचे शैक्षणिक वर्ष पुर्ण न करता त्यांनी एवढी मोठी साहित्याची मांडणी करून साहित्य रसिकांना एक साहित्यातील कधी न संपणारी मेजवानी दिली आहे त्या मेजवानीचा आनंद आज सुद्धा साहित्य रसिक घेतांना दिसुन येतात. त्यामुळे हे साहित्य आज फक्त नावापूरते साहित्य नसुन आज अजरामर साहित्य पर्वणी आहे जी कधी न संपणारी आहे.त्यामुळे प्रत्येकानी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन एकदातरी आवश्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे  संचालन  प्रकाश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन हे अजय ताजने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता  जितेश गायकवाड , गजानन जुमडे , विष्णु  अंभोरे , यशवंत गायकवाड , आदिनी सहकार्य केले.

Comments

Post a Comment

THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू