कॅन्सल झालेलं Ration Card कसं कराल अॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस
रद्द झालेलं Ration Card कसं कराल अॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस
रेशन कार्डधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर (Ration Card) स्वस्त दरातील धान्य घेत नसाल, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. यापूर्वीच जर तुमचंही रेशन कार्ड रद्द झालं असेल तर ते पुन्हा अॅक्टिव्ह करता येईल.
जाणून घ्या Ration Card पुन्हा ऍक्टिव्ह करण्याची सोपी पद्धत :-
– सर्वात आधी राज्य किंवा सेंट्रल AePDS पोर्टलवर जा.
– आता Ration Card Correction पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
– Ration Card Correction पेज वर तुमचा रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरावा लागेल.
– आता तुमच्या रेशन कार्डमध्ये काही चूका असल्यास त्या दुरुस्त करता येतील.
– त्यानंतर PDS अर्थात Public Distribution Systemकार्यालयात अर्ज सबमिट करावा लागेल.
– तुमचं रेशन कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी अर्ज स्वीकारल्यास त्यानंतर रद्द झालेलं रेशन कार्ड सक्रीय अर्थात अॅक्टिव्ह होईल.
नियमानुसार, जर एखाद्या रेशनकार्ड होल्डरने मागील सहा महिन्यांपासून रेशन कार्डवर धान्य घेतलेलं नसेल, तर त्याला स्वस्तात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही किंवा तो व्यक्ती स्वस्त दरातील धान्य घेण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या या सुविधेचा अनेक जण लाभ घेत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य न घेतलेल्या व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME