श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी शंकर रोहि सर यांची निवड

 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी शंकर रोहि सर यांची निवडl




रिसोड .- (युगनायक न्यूज नेटवर्क )

 परिसरातील धार्मिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या आणि महंत श्री शांतीपूरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवता नगरीचे रहिवासी असलेले श्री शंकर रोही सर यांची आज श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी निवड झाली श्री शंकर रोही सर यांना सुरुवातीपासूनच शिक्षणाची आणि मुलांना शिकवण्याची आवड होती,

रोही सर यांचे शिक्षण BA BPED पर्यंत झालेले असून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याची सुरुवात, एक शिक्षक म्हणून 1 नोव्हेंबर 2001 पासून सुरुवात केली

श्री शिवाजी विद्यालय च्या सुरुवातीपासून त्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं मोलाचे योगदान दिलं आहे. सुरुवातीला श्री शिवाजी विद्यालय नेतन्सा येथे होते परंतु शांतिपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी तेथून श्री शिवाजी विद्यालय येवता येथे आणले तेव्हापासूनच श्री रोहि सर यांनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घातला .श्री शिवाजी विद्यालय वाढविण्यासाठी त्यांनी खूप मदत केली .त्यांचा स्वभाव एकदम शांत संयमी स्मितभाषी आणि खेळकर असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासोबत त्यांचं एक  मनापर्यंत नातं जुळत गेलं. विद्यार्थ्यांच्या अडचणी ते प्रत्येक वेळी आपल्या पद्धतीने सोडवत गेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मधला दुवा म्हणजे श्री रोहि सर होते.ही देशाची तरुण पिढी शिक्षक घडवत असतात त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रोहि सर ,सरांनी कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये कधी भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी विविध मैदानी खेळांची  विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून खेळाचे जीवनामधील काय महत्त्व आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवले रोहि सराचे संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित आणि आदर्श कास्तकार असून सर्वांनी येवता गावामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. योगायोगाने त्यांच्या मुलाचे नाव पण भूषणच आहे आणि आता त्यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्यामुळे ते आता येवताच नव्हे तर गावातील प्रत्येकाचे भूषण झाले आहेत त्यांची प्रत्येक सामाजिक कार्यात आम्हाला नेहमीच मदत असते. त्यांनी आतापर्यंत केलेल्या  कामाची दखल घेऊनच त्यांना मुख्याध्यापक पदाचा मान मिळाला आणि येवता गावचे नाव रोशन झाले याच निमित्ताने  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ संघटक व सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन देशमुख यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,त्याचबरोबर गावाची, समाजाची त्यांच्या हातून सेवा घडो अशा शुभेच्छा गजानन देशमुख यांनी आपल्या भाषणात दिल्या यावेळी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संघर्ष खंदारे, वैभव काकडे कैलास ईढोळे इत्यादी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू