Posts

Showing posts from August, 2020

कोरोना_अलर्ट (दि. ३१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.०० वा.)

Image
कोरोना_अलर्ट (दि. ३१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.०० वा.)   ५८ व्यक्तींना डिस्चार्ज वाशिम शहरातील इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटल परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ८, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, गुरुवार बाजार परिसरातील १, वारा जहांगीर परिसरातील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, साळीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, महावीर नगर येथील १, मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील १, शेलूबाजार येथील २, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, धोडप बोडखे येथील ४, येवती येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, दुधाळा येथील ४, शिरपूर जैन येथील ८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गव्हाणकर नगर परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, दंडे चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ३, काटा येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, फ...

नटरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मालेगाव करांसाठी विविध कलागुणांची मेजवानी मालेगाव फेस्टिवलचे आयोजन

Image
*नटरंग* *सांस्कृतिक* *संस्थेच्या* *वतीने* *मालेगाव* *करांसाठी* *विविध* *कलागुणांची* _मेजवानी_   *मालेगाव* *फेस्टिवलचे* *आयोजन* नटरंग सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था मालेगाव द्वारा मालेगाव सांस्कृतिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.          प्रस्तुत महोत्सवांमध्ये बाल, युवा व प्रौढ कलावंतांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये लावणी , पारंपारिक नृत्य, एकपात्री अभिनय, इत्यादी विविध कलागुणांचा समावेश असून मालेगाव तालुक्यातील कलावंतांनी आपली कला सादर करण्यासाठी संस्थेद्वारा प्रवेश  अर्ज भरून सोबत दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड , यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबाबत प्रमाणपत्र तथा पेपर कटिंग फोटोग्राफी तसेच ज्या गावातून कलावंत आले असतील त्या गावातील पोलीस पाटील/सरपंच/ग्रामसेवक/तलाठी/प्रशासक यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र प्रवेश अर्जासोबत जोडणे अथवा पेन ड्राईव्ह ,जीबी कार्ड, व्हाट्सअप वर पीडीएफ फाईल सह खालील पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत पाठविण्यात यावी. असे आवाहन नटरंग सांस्कृतिक संस्थेच्यावतीने संयोजक - सुभाष गाभणे, अध्यक्ष - अनिल बळी, स...

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी निधी मंजूर...!* (विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश)

Image
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी निधी मंजूर...!* (विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश) रिसोड 29 ऑगस्ट2020= कोरोना या जागतिक महामारी मुळे अनेक महिन्या पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी वाटपास स्थगिती देण्यात आली होती.त्यामुळे विद्यार्थ्यावर प्रचंड आर्थिक संकट ओढावल होत.आज सामाजिक न्याय मंत्रालयाने स्वाधार योजनेचा निधी वाटपास मान्यता दिली आहे.     सन 2020-21 या आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने करिता अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद मजूर करण्यात आली होती. त्या पैकी 35 कोटी निधी वाटपास सामाजिक न्याय मंत्रालयाने मान्यता दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी वाटपास विलंब करीत आहे. हे लक्षात येतातच गणेश धांडे या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने स्वाधार पात्र अनुश्री हिरादेवे,सतीश पंडित,प्रविण प्रधान,अश्वजित भारसाकळे,दीपक पगारे, विकी कांबळे इत्यादी असंख्य विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचे नेतृत्व गणेश धांडेने केले. प्रथम सर्व विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून स्वाधार योजना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुरुवातीला 100 विद्यार्थ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट वाशिम शहरातील बाळू चौक येथील १, देवपेठ येथील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, अनसिंग येथील १, वारा जहांगीर येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ६, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, कळंबा बु. येथील १, रामगड येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, आखातवाडा पीएनसी कॅम्प येथील ४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात   आणखी ५७ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील निमजगा येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, इनामदारपुरा येथील २, जुनी आययुडीपी येथील २, लाखाळा येथील ४, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, पाटणी चौक येथील १, सुभाष चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, अनसिंग येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील १, शिरपूर जैन येथील १, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, मंगरूळपीर नगरपरिष...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 कोरोना अलर्ट (दि. २६ ऑगस्ट २०२०, सायं. ६ वा.)  आज २५ व्यक्तींना डिस्चार्ज वाशिम शहरातील चंडिकावेस परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसरातील १, खामगाव जीन परिसरातील १, कोल्ही येथील २, कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ४, माळीपुरा येथील १, काजळेश्वर येथील १, रिसोड तालुक्यातील मांडवा येथील १, येवती येथील १, आसेगाव पेन येथील ९, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुभाष चौक येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, शुक्रवार पेठ येथील १, निमजगाव येथील १, जवळा येथील १, खारोळा येथील १, रिसोड शहरातील अग्रवाल भवन समोरील परिसरातील १, आंबेडकर नगर परिसरातील १, सवड येथील ३, आसेगाव पेन येथील १,  मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. १७ येथील १, डॉ. माने हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडा येथील १, मारसूळ येथील १, दुधाळा येथील ३, मैराळडोह येथील १, मानोरा तालुक्यातील सोमनाथनगर...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. २६ ऑगस्ट २०२०, सायं. ६

कोरोना अलर्ट (दि. २६ ऑगस्ट २०२०, सायं. ६ वा.)   आज २५ व्यक्तींना डिस्चार्ज वाशिम शहरातील चंडिकावेस परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसरातील १, खामगाव जीन परिसरातील १, कोल्ही येथील २, कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ४, माळीपुरा येथील १, काजळेश्वर येथील १, रिसोड तालुक्यातील मांडवा येथील १, येवती येथील १, आसेगाव पेन येथील ९, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुभाष चौक येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, शुक्रवार पेठ येथील १, निमजगाव येथील १, जवळा येथील १, खारोळा येथील १, रिसोड शहरातील अग्रवाल भवन समोरील परिसरातील १, आंबेडकर नगर परिसरातील १, सवड येथील ३, आसेगाव पेन येथील १,  मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. १७ येथील १, डॉ. माने हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडा येथील १, मारसूळ येथील १, दुधाळा येथील ३, मैराळडोह येथील १, मानोरा तालुक्यातील सोमनाथन...

सनदी लेखापाल यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सनदी लेखापाल यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २५ (जिमाका) :   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता पात्रताधारक सनदी लेखापाल (सीए) यांनी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ‘आत्मा’ कार्यालयात दरपत्रक सादर करण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एस. एम. तोटावार यांनी केले आहे. सनदी लेखापाल यांना कमीत कमी ७ ते १० वर्षाचा शासकीय, निमशासकीय कार्यालयांतर्गत शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल बनविण्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे. सनदी लेखापाल हे वाशिम जिल्ह्याचे रहिवाशी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ‘आत्मा’ कार्यालयामध्ये आठवड्यातून एक दिवस काम एक दिवसाचे मानधन देण्यात येईल. तसेच सदर निवड फक्त ११ महिन्यांच्या कालावधीसाठी राहणार असून त्यानंतर आपोआप संपुष्टात येईल. काम समाधानकारक नसल्यास निवड तत्काळ रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पात्रताधारक सनदी लेखापालांनी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आप...

शिष्यवृत्ती रककम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु

  शिष्यवृत्ती रककम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु वाशिम ,   दि. २१ (जिमाका) :  अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेलेया योजनांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अर्ज स्वीकारण्याची सुविधा ३ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आली होती, सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी १७ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. सदर अर्जावर वाशिमचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मान्यता प्रदान केल्यानंतर आयुक्तालय स्तरावरून (डीडीओ) त्यांचे देयक तयार करून कोषागारातून देय असलेली रक्कम पारित करून महाडीबीटी पोर्टलच्या पूल बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर रक्कम पीएफएमएस या केंद्रीभूत वितरण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा होणे अपेक्षित आहे. तद्पुर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्यास असल्याची पडताळणी एनपीसीआय या केंद...

आवश्यकता नसताना अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न त्यात मोजक्याच लोकांना केले टार्गेट बाकीच्याना अभय

Image
  आवश्यकता  नसताना  अतिक्रमण काढण्याचे  प्रयत्न त्यात  मोजक्याच  लोकांना  केले  टार्गेट  बाकीच्याना  अभय       रिठद . (स्थानिक  प्रतिनिधी )     रिसोड  तालुक्यातील  रिठद  या  गावी ग्रामपंचायत चे  कुठलेही  शासकीय  किंवा  सार्वजनिक  प्रयोजन  नसताना  रस्त्याच्या  कडेला  लॉकडाउन  च्या  काळात  उपासमारी वर    मात  करण्यासाठी  मंजूरांनि कुणाला  त्रास  होणार  नाही  अश्या  ठराविक  जागी अतिक्रमण  करून  आपल्या संसाराची  चूल  पेटवून  जीवन  जगण्याचा  प्रयत्न  रिठद येथील  नागरिक  करत  आहेत. अश्यातच लोकांचा  रोजगार  मोडण्याचा  प्रयत्न  ग्रामपंचायत  कडून  सोमवार  दि २४/०८/२०२०रोजी  पोलीस  बंदोबस्त  मध्ये  करण्यात  आला  त्यात  सीताराम  बोरकर  यांचे वेल्डिंग चे...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

Image
  कोयाळी  खुर्द. (अमोल  पोळकर )  लोकशाहीर  अण्णाभाऊ  साठे  यांची  जयंती  मोठया   उत्साहात  साजरी जयंती  निमित्त  पिवळा  ध्वज  लावण्यात  आला  गावातील  प्रस्थापितांचा विरोध  असतांनासुद्धा मातंग बांधव  डगमगले  नाही.

व्यवस्थे पलीकडील शिक्षण आणि बदल

Image
 व्यवस्थे पलीकडील शिक्षण आणि बदल                                    शिक्षण हे जीवनाच्या वेळीवरचे सुंदर फूल आहे.समाज विकसित आणि प्रफुल्लित करण्याचे साधन शिक्षणाला मानले जाते. भुगर्भाच्या अविर्भागात असणारी सौंदर्यस्थळे ,तसेच निसर्गामध्ये असलेली अतिरम्यता ही शिक्षणाने विकशीत बुद्धी अगदी अचूक टीपु शकते. त्याप्रमाणे हवा,पाणी वृक्ष यांच महत्व पर्यावरण शिक्षणाने व्यक्तीला देता येतो.  निर्जीव वस्तूची सौदर्यरूपी सांगड घालून त्यांना बोलक करणारे हे शिक्षण व्यक्तीच्या व्यक्तित्वाला कपड्यांच्या फॅशनची झालर लावून व्यक्तिमत्व  खुलविणार शिक्षण अगदी जगाच्या विकासात सुवर्णक्षरी नोंद असलेले हे शिक्षण,ज्यांच मूल्य अगदी पराकोटीच आहे याच शिक्षणाला आज जणू काही एखाद्या गाडीला ब्रेक लागल्या सारखे थांबल्यागत वाटत आहे.  आज निरागस आणि चिमुकली मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी सज्ज होती. पण कोरोना मूळे म्हणावस वाटतंय  “केव्हा शिकतील आता दोन आणि एक कधी सुटेल हा शिक्षणाचा ब्रेक” हे शैक्षणिक सत्र तर सु...

कुंभश्री मूर्ती कला केंद्र रिठद येथे विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध

Image
कुंभश्री  मूर्ती  कला  केंद्र  रिठद  येथे  विविध  प्रकारच्या   गणेश  मूर्ती  विक्रीस  उपलब्ध                       रिठद. रिसोड  तालुक्यातील  लोकसंख्येने  सर्वात  मोठे  गाव  म्हणजे  रिठद  ज्याला  प्राचीन  इतिहासाचा  वारसा  हक्क  मिळालेला आहे  मग  त्यात मूर्तीकला हे  क्षेत्र  कसे  वगळता  येईल. घरात  सुरवातीपासूनच  वडिलोपार्जित  विविध  मुर्त्या  बनवून  विकण्याचा  व्यवसाय  म्हणजे  घरातून  वारसा हक्काने  प्राप्त  झालेल  कौशल्य  आज  विज्ञान व नवीन  तंत्रज्ञान  यांची  सांगड  घालून  ध्येय  वेडा  तरुण म्हणजे  संदीप  राऊत  ज्याने  आज  रिठद  सारख्या  गावात मूर्ती  कला  केंद्र  सुरु  केले  असून   गणेशोत्सवा निम...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.३० वा.)

  #कोरोना_अलर्ट (दि. २१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.३० वा.)   ५३ व्यक्तींना डिस्चार्ज वाशिम शहरातील काटीवेस परिसरातील ७, ड्रिमलँड सिटी परिसरातील ३, गणेश पेठ परिसरातील १, झाकलवाडी येथील १, साखरा येथील ३, पार्डी आसरा येथील १, अनसिंग येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा येथील २, शिरपूर जैन येथील १०, मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ९, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, गोहगाव हाडे येथील २, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, सोहळ येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे   जिल्ह्यात आणखी ३० कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेर्पर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्त नगर येथील ३, टिळक चौक परिसरातील १, कोल्हाटकरवाडी परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, जुनी जिल्हा परिषद परिसरातील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, महाराणा प्रताप चौक परिसरातील १, ढिल्ली येथील १, वारा जहांगीर येथील १, अनसिंग येथील १, मालेग...

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा वाशिम ,   दि. २१ (जिमाका) :  जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश आगमन होत असून श्रीगणेश मूर्तिकारांनी श्रीगणेश मूर्तीच्या विक्रीसाठी वाढीव वेळ मिळण्यासाठी अर्ज केला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पा    सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा  लन करण्याच्या अटीवर २२ ऑगस्ट २०२० रोजीपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वा. या कालावधीत जिल्ह्यातील श्रीगणेश मूर्ती विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.  

रेडिओ वत्सगुल्म ९०.८ एफ.एम चा लढा कोरोनाशी कार्यक्रम ठरत आहे मार्गदर्शक

Image
वाशीम :- सामुदायिक रेडिओ संघटना,नवी दिल्ली च्या सहाय्याने रेडिओ वत्सगुल्म ९०.८ एफ,एम.,वाशीम वर “लढा कोरोनाशी” या जागृती पर कार्यक्रमांच प्रसारण केल जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना काळात जेष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी, स्वच्छता,मास्क चा वापर, अन्नसुरक्षा,स्तनपान,गृहविलागीकरण,शारीरिक व सामाजिक अंतर,घरी राहा सुरक्षित रहा न्युट्रिशन या विविध विषयावर तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती च्या माध्यमातून प्रभावी जनजागृती रेडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

श्रीगणेश आगमन, विसर्जनप्रसंगी मद्यविक्री बंद

श्रीगणेश आगमन, विसर्जनप्रसंगी मद्यविक्री बंद वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश स्थापना होणार आहे. तसेच १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात श्रीगणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे २२ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०२० रोजी ज्या गावातील श्रीगणेश विसर्जन आहे, त्या गावातील मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ७४२०९३३९४३), वाशिम शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९०२१५८४८७६), वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंपणे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३९१३१२८), रिसोडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ७७२२०३५२०९), मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९६६७१०९४५९), शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान ...

गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई

  गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई वाशिम ,   दि. २१ (जिमाका) :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री गणेश आगमन व विसर्जन प्रसंगी मिरवणुका काढण्यास तसेच गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. ढोल, ताशे, डीजे सिस्टीम, डॉल्बी व इतर वाद्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) गणेश मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंडळातर्फे श्रीगणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर एखाद्या भागात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्ण सापडल्यास, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र संबंधातील सर्व नियम काटेकोरपणे लागू केले जातील. अशा ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात केवळ दोन व्यक्तींना आरती व पूजा करण्याची मुभा राहील. स्थानिक स्वराज्य संस्थेने श्रीगणेश स्थापना व विसर्जनासाठी योजिलेल्या उपाययोजना पाळणे सर्वांना बंधनकारक राहील. श्रीगणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर...

वाशिम 'वंचित'च्या वतीने एसटीच्या वाहक चालकांचा सत्कार करीत प्रवास.

Image
 वाशिम 'वंचित'च्या वतीने एसटीच्या वाहक चालकांचा सत्कार करीत प्रवास. वाशिम-  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली१२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र डफळे बजाव आंदोलन केले होते.आगामी काळात एसटी सेवा सुरू न केल्यास वंचीत पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना घेऊन पून्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे सरकारने तातडीने एसटी सेवा सुरू केली.आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ह्यांनी नवीन आणि जुने बस स्थानक येथील एसटी बसेस च्या वाहक चालकांचा सत्कार करीत एसटी मध्ये प्रवास केला. डफळे बजाव आंदोलनाला भरभरून यश मिळाले.त्याने हादरलेल्या सरकारने तातडीने पाऊले उचलत गरीब जनतेला व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या पुढे ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व समस्येवर सहकार्य करण्याचे अभिवचन वंचित बहुजन महिला आघाडीचे प्रदेश सदस्या मा.किरणताई गिऱ्हे,वंचित बहुजन आघाडी गोवर्धन सर्कल प्रमुख विनोद अंभोरे,सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हाध्यक्ष पारितोष इंगोले यांनी दिले.ह्यावेळी...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा, कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Image
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा, कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम ,  दि. १९ :  राज्यातील मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कर्ज व्याज परतावा व कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ‘महास्वयंम’ ( www.mahaswayam.gov.in )  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आरआर-१) योजनेची कर्ज मर्यादा १० लक्ष रुपये, गट कर्ज व्याज परतावा (आयआर-२) योजनेची कर्ज मर्यादा १० ते ५० लक्ष रुपये आहे. तसेच गट प्रकल्प कर्ज योजना (एफपीओ)(जीएल-१) योजनेंतर्गत १० लक्ष रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, पु...

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा -  जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक वाशिम ,  दि. १९ :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे पालन करून, अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, मंगरूळपीरच्या नगराध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन मारुफ खान, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जयंत देशपांडे, राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड, यशवंत केडगे, संजय पाटील यांच्यासह नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री मोडक म्हणाले, कोरोना संसर्गाचे काळात सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्ह्यातील काही गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर मंडळानी सुद्धा असा निर्णय घेवून प्रशासनाला सहकार्य करावे. ...