आवश्यकता नसताना अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न त्यात मोजक्याच लोकांना केले टार्गेट बाकीच्याना अभय
आवश्यकता नसताना अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न त्यात मोजक्याच लोकांना केले टार्गेट बाकीच्याना अभय रिठद. (स्थानिक प्रतिनिधी ) रिसोड तालुक्यातील रिठद या गावी ग्रामपंचायत चे कुठलेही शासकीय किंवा सार्वजनिक प्रयोजन नसताना रस्त्याच्या कडेला लॉकडाउन च्या काळात उपासमारी वर मात करण्यासाठी मंजूरांनि कुणाला त्रास होणार नाही अश्या ठराविक जागी अतिक्रमण करून आपल्या संसाराची चूल पेटवून जीवन जगण्याचा प्रयत्न रिठद येथील नागरिक करत आहेत. अश्यातच लोकांचा रोजगार मोडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत कडून सोमवार दि २४/०८/२०२०रोजी पोलीस बंदोबस्त मध्ये करण्यात आला त्यात सीताराम बोरकर यांचे वेल्डिंग चे दुकान व जनावराच्या गोठ्याचा सुद्धा समावेश आहे सदर व्यक्ती एक कुशल शेतकरी असून त्यांच्या गोठ्यात असणाऱ्या शेतउपयोगी सामान व जनावराच्या चाऱ्या चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून सदर एकाच व्यक्तीवर अन्याय होताना दिसून येतोय.कारण रिठद येथील अतिक्रमण काढतांना मोजक्याच लोकांना अभय देऊन इतर कुठलेही अतिक्रमण काढण्यात आले नाही.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME