व्यवस्थे पलीकडील शिक्षण आणि बदल
शिक्षण हे जीवनाच्या वेळीवरचे सुंदर फूल आहे.समाज विकसित आणि प्रफुल्लित करण्याचे साधन शिक्षणाला मानले जाते. भुगर्भाच्या अविर्भागात असणारी सौंदर्यस्थळे ,तसेच निसर्गामध्ये असलेली अतिरम्यता ही शिक्षणाने विकशीत बुद्धी अगदी अचूक टीपु शकते. त्याप्रमाणे हवा,पाणी वृक्ष यांच महत्व पर्यावरण शिक्षणाने व्यक्तीला देता येतो. निर्जीव वस्तूची सौदर्यरूपी सांगड घालून त्यांना बोलक करणारे हे शिक्षण व्यक्तीच्या व्यक्तित्वाला कपड्यांच्या फॅशनची झालर लावून व्यक्तिमत्व खुलविणार शिक्षण अगदी जगाच्या विकासात सुवर्णक्षरी नोंद असलेले हे शिक्षण,ज्यांच मूल्य अगदी पराकोटीच आहे याच शिक्षणाला आज जणू काही एखाद्या गाडीला ब्रेक लागल्या सारखे थांबल्यागत वाटत आहे. आज निरागस आणि चिमुकली मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी सज्ज होती. पण कोरोना मूळे म्हणावस वाटतंय
“केव्हा शिकतील आता
दोन आणि एक
कधी सुटेल हा
शिक्षणाचा ब्रेक”
हे शैक्षणिक सत्र तर सुरू झाले मात्र समाजिक,शैक्षणिक सत्राला अद्यापही सुरुवात झालेली नाही. जवळ जवळ सहा महीने होत आले आहे. नुकताच दहावी,बारावीचा निकाल लागला पण ऐरव्ही पावसाच्या पाण्यासाठी चातकासारखी मुले आज मार्कशीट घ्यायला येतांना दिसत नाही. त्यांच समाजमन अजूनही कोरोनान ग्रासले आहे.हे ग्रहण कधी सुटेल आणि कस सुटेल हा खूप मोठा यक्ष प्रश्न उभा राहीला आहे?ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण घेणारी मूळ खरंच मन,मनगट आणि बुद्धीने परिपक्व होतील का? अशी अनेक प्रश्न आपल्या समोर आ वासून उभी आहे. जेव्हा विद्यार्थी शिक्षकांचे मन, शरीर, कृती आणि हावभाव टिपतात तेव्हाच सक्षम शिक्षणाची भाषा अवगत होत असते. शहरी भागातील विद्यार्थी डिजिटल ऑनलाईन शिक्षण एक पर्याय म्हणून काही प्रमाणात घेऊ शकतील,पण ग्रामीण भागातील मुलांच काय? ग्रामीण भागत ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक समस्या आहे. मध्यंतरी ग्रामीण भागात जनजागृती व पटनोंदणी करिता गृहभेट दिली असता पालकांचे विचार एकूण जणू काही माझ्या साठवण्याच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यातच या लेखानिमित्त समोर आला. मी पालकांना आता ‘शाळा बंद मात्र शिक्षण सुरू तेही मोबाईल वरुण’असे सांगितले तर ते पालक अगदी म्हणतात काय ?
“गुरुजी अनेक समस्या
उभ्या आहेत आ वासून
सांगा गुरुजी मोबाईल घेऊ कुठून कोरोनान रोजगार गेला म्हणे सुटून निघाल नशीब आमच फुटून सांगा गुरुजी मोबाईल घेऊ कुठून जागरण-गोंधळ काम माझ तेही गेल हातून
सांगा गुरुजी मोबाईल घेऊ कुठून” ही कविता सत्य परिस्थिति सांगतो.तसेच प्रत्येक गरीब घरातील त्या सर्व पालकांना जे हातमजूरी करतात त्यांची व्यथा ही सांगते. अश्या विवंचना विव्हळतांना मन गहिवरून गेले,तडफडून निघाल. शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्राशिक्षण संस्था अमरावती यांच्या संकल्पनेतून ‘ऑफलाईन शिक्षण’ जिल्ह्यातील मुख्यकार्यकारीअधिकारी मा.श्री अमोल येडगे साहेब यांनी दिशा निर्देशाने ‘शिक्षक मित्र’ हा उपक्रम हाती घेतले आहे. गावातील सुशिक्षिक असलेले व स्वयंप्रेरणेने काम करणारी व्यक्ति निवडून,प्रत्येक वर्गाला एक असे कुठलेही मानधन न घेता विना वेतन काम करणाऱ्यांची निवड शाळा व्यवस्थापन समिति,पालक समिति यांच्याशी चर्चा करून करणे,व त्यांना या बाबत कळविणे.संपूर्ण सोशल डिस्टनस करून दररोज विद्यार्थी ला अध्यापन करायचे.विद्यार्थी ज्या परिसरात राहतो,त्या मोहल्यातील इयत्ता 1 ते 5 एक गट व 6 ते 8 हा दूसरा गट तयार करणे आहे. यात वर्गाचे निकष तसेच सर्व जबाबदाऱ्या निश्चित केले आहे.याउपक्रमातून थोड का होईना मुलांना प्रत्यक्ष शिक्षण मिळण्यास मदत मिळत आहे.
- लखन देविसिंग जाधव
सहायक शिक्षक
जिल्हा परिषद पूर्व.माध्यमिक, शाळा,खोलापूर पंस भातकुली जिल्हा :- अमरावती
शिक्षण:- एम ए बीएड डीएड डीएसएम ८६६८३९५०३०
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME