अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा, कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या
कर्ज व्याज परतावा, कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. १९ : राज्यातील मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कर्ज व्याज परतावा व कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ‘महास्वयंम’ (www.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आरआर-१) योजनेची कर्ज मर्यादा १० लक्ष रुपये, गट कर्ज व्याज परतावा (आयआर-२) योजनेची कर्ज मर्यादा १० ते ५० लक्ष रुपये आहे. तसेच गट प्रकल्प कर्ज योजना (एफपीओ)(जीएल-१) योजनेंतर्गत १० लक्ष रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, पुरुष उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्षे व महिला उमेदवाराचे वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे. उमेदवार हा मराठा प्रवर्गातील असावा, ईएसबीसी जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न असावा व आधारकार्ड कर्ज खात्याशी जोडलेले असावे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लक्ष रुपयांच्या मर्यादेत असावे. याबाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अथवा इन्कमटॅक्स रिटर्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
दिव्यांक अर्जदाराकडे सक्षम यंत्रणेने दिलेले प्रमाणपत्र असावे. उमेदवाराने अर्ज करतांना या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंडळांच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज प्रकरण हे सीबील प्रणाली अथवा तत्सम प्रणाली सदस्य असलेल्या बँकेत केलेले असावे. उमेदवार कोणत्याही बँकेचा, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. उमेदवाराने www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ‘इंटरप्रिनरशीप’ या टॅबचा वापर करून नोंदणी करावी.
आतापर्यंत २२ लाभार्थ्यांना व्याज परतावा
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ लाभार्थ्यांना १० लक्ष ३५ हजार १७४ रुपये व्याज परतावा मिळाला आहे. या योजने लाभार्थ्यांनी अंतर्गत दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, कुक्कुटपालन, मोबाईळ शॉपी, कापड दुकान, मेडिकल शॉपी, मेन्सवेअर आदी व्यवसाय सुरु केले आहेत.
*****
ReplyReply allForward |
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME