गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई
गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई
वाशिम, दि. २१ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री गणेश आगमन व विसर्जन प्रसंगी मिरवणुका काढण्यास तसेच गणेशोत्सवात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ढोल, ताशे, डीजे सिस्टीम, डॉल्बी व इतर वाद्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) गणेश मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंडळातर्फे श्रीगणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर एखाद्या भागात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्ण सापडल्यास, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र संबंधातील सर्व नियम काटेकोरपणे लागू केले जातील. अशा ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात केवळ दोन व्यक्तींना आरती व पूजा करण्याची मुभा राहील.
स्थानिक स्वराज्य संस्थेने श्रीगणेश स्थापना व विसर्जनासाठी योजिलेल्या उपाययोजना पाळणे सर्वांना बंधनकारक राहील. श्रीगणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन घरी करावे. शासनाच्या ११ जुलै २२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केल्या आहेत.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME