वाशिम 'वंचित'च्या वतीने एसटीच्या वाहक चालकांचा सत्कार करीत प्रवास.


 वाशिम 'वंचित'च्या वतीने एसटीच्या वाहक चालकांचा सत्कार करीत प्रवास.


वाशिम-  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली१२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र डफळे बजाव आंदोलन केले होते.आगामी काळात एसटी सेवा सुरू न केल्यास वंचीत पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना घेऊन पून्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे सरकारने तातडीने एसटी सेवा सुरू केली.आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ह्यांनी नवीन आणि जुने बस स्थानक येथील एसटी बसेस च्या वाहक चालकांचा सत्कार करीत एसटी मध्ये प्रवास केला.


डफळे बजाव आंदोलनाला भरभरून यश मिळाले.त्याने हादरलेल्या सरकारने तातडीने पाऊले उचलत गरीब जनतेला व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या पुढे ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व समस्येवर सहकार्य करण्याचे अभिवचन वंचित बहुजन महिला आघाडीचे प्रदेश सदस्या मा.किरणताई गिऱ्हे,वंचित बहुजन आघाडी गोवर्धन सर्कल प्रमुख विनोद अंभोरे,सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हाध्यक्ष पारितोष इंगोले यांनी दिले.ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी एस टी मध्ये प्रवास यात्रा करून गाडीचे चालक यांचा सत्कार केला.तसेच कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता  शासनाने कोरोना रोग प्रतिबंधा करिता योजिलेले नियम पालन करत आपल्याला प्रवासाला सुरुवात करावी जनतेला आव्हान केले आहे.  


या एस टी प्रवासावेळी वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश सदस्या मा.किरणताई गिऱ्हे ,वंचित बहुजन आघाडी गोवर्धन सर्कल प्रमुख विनोद अंभोरे,सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हाध्यक्ष पारितोष इंगोले,सम्यक महासचिव सिंहलदादा पठाडे,सम्यक जिल्हासचिव नागसेन धांडे,जिल्हाउपाध्यक्ष रिषभ बोरा,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतिष लोणकर ,सम्यक विद्यार्थी आंदोलन रिसोड तालुका संपूर्ण कमिटी,पदाधिकारी व वंचित चे विरपीन इंगोले,देवा इंगोले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू