श्रीगणेश आगमन, विसर्जनप्रसंगी मद्यविक्री बंद
श्रीगणेश आगमन, विसर्जनप्रसंगी मद्यविक्री बंद
वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश स्थापना होणार आहे. तसेच १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात श्रीगणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे २२ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०२० रोजी ज्या गावातील श्रीगणेश विसर्जन आहे, त्या गावातील मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME