जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ७४२०९३३९४३), वाशिम शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९०२१५८४८७६), वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंपणे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३९१३१२८), रिसोडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ७७२२०३५२०९), मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९६६७१०९४५९), शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३, भ्रमणध्वनी क्र. ९९२१००४२८८), मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०६६२, भ्रमणध्वनी क्र. ९९२३१३२८६६), मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३३३, भ्रमणध्वनी क्र. ८८०६०७३०९०), अनसिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तसरे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२२६०३४, भ्रमणध्वनी क्र. ९४२०७५६७९५), आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३५५५८, भ्रमणध्वनी क्र. ९९२३१३००७४), जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७२०१६), भ्रमणध्वनी क्र. ९८८१४६३३६५), कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२००८, भ्रमणध्वनी क्र. ९९२३१३२८६६), कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२१००, भ्रमणध्वनी क्र. ९४०५४९१२४९), कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शेंबळे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२४००, भ्रमणध्वनी क्र. ९०२८८१९२९७), मानोराचे पोलीस निरीक्षक शिशिर मानकर (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३३२२९, भ्रमणध्वनीक्र. ९८२३२३०६१४), धनजचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२३२०३०, भ्रमणध्वनी क्र. ८५५१९६२६२०) या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण (भ्रमणध्वनी क्र. ७७०९९७५९०६, दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२७५५, ई-मेल आयडी : readeraddspwashim@gmail.com, addlsp.wsm@mahapolice.gov.in) असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीराम घुगे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१३५५, भ्रमणध्वनी क्र. ९८२३१५७०५१, ई-मेल आयडी : dysphome.wsm@mahapolice.gov.in) हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी (दूरध्वनी क्र. ०७२१-२५६३५९३, फॅक्स क्र. ०७२१-२५६३५९७, ई-मेल आयडी : roamravati@mpcb.gov.in) हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस अथवा sp.washim@mahapolice.gov.in या ई-मेलवर संदेश पाठवू शकतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू