*डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 35 कोटी निधी मंजूर...!* (विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश)
(विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश)
रिसोड 29 ऑगस्ट2020= कोरोना या जागतिक महामारी मुळे अनेक महिन्या पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी वाटपास स्थगिती देण्यात आली होती.त्यामुळे विद्यार्थ्यावर प्रचंड आर्थिक संकट ओढावल होत.आज सामाजिक न्याय मंत्रालयाने स्वाधार योजनेचा निधी वाटपास मान्यता दिली आहे.
सन 2020-21 या आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने करिता अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद मजूर करण्यात आली होती. त्या पैकी 35 कोटी निधी वाटपास सामाजिक न्याय मंत्रालयाने मान्यता दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी वाटपास विलंब करीत आहे. हे लक्षात येतातच गणेश धांडे या पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने स्वाधार पात्र अनुश्री हिरादेवे,सतीश पंडित,प्रविण प्रधान,अश्वजित भारसाकळे,दीपक पगारे, विकी कांबळे इत्यादी असंख्य विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचे नेतृत्व गणेश धांडेने केले. प्रथम सर्व विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून स्वाधार योजना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुरुवातीला 100 विद्यार्थ्यांच्या सह्या असलेले निवेदन तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, व समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद,बुलढाणा,वाशीम याना पाठविण्यात आले.परंतु निवेदन पाठून ही आपली मागणी मान्य होत नाही. हे लक्ष्यात येताच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन आंदोलन करण्यास सुरुवात केली.व सतत पाठपुरावा करून ही मागणी मान्य होत नाही. हे लक्ष्यात येताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सर्व स्वियसाहाय्यकांचे फोन नंबर मिळवले आणि एक मॅसेज तयार करून 7 दिवसात स्वाधार योजनेचा निधी मिळाला नाही.तर सर्व विद्यार्थी आक्रमक होऊन समाजकल्याण कार्यालय औरंगाबाद समोर मोठे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व शासनास दिला.व होणार्या परिणामास धनंजय मुंडे व शासन जबाबदार असेल अशी आक्रमक भूमिका मांडली होती.हा मॅसेज सर्व विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे व त्यांच्या सर्व स्वियसाय्यकांना व्हाॅट्सअॅप मॅसेज पाठवायला सांगितले.तसेच सर्व स्वियसाहाय्यकांना फोन करून विद्यार्थ्यांनाच त्यांची मागणी सांगण्याचे आवाहन केले.या आंदोलनास धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. 7 दिवसात निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्या बदल विद्यार्थ्याच्या वतीने गणेश धांडे या विद्यार्थ्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME