Posts

मादनी येथिल 0 ते 5 वयोगटातिल बालकांनी घेतले दो बुंद जिंदगी के

Image
  मादनी येथिल 0 ते 5 वयोगटातिल बालकांनी घेतले दो बुंद जिंदगी के मेहकर - (युगनायक न्युज नेटवर्क ) दि. 27 /02/2022 रोज रविवारला राज्यभर  पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती त्यानुसारच डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे मादनी येथे दि.26/02/2022 रोज शनिवारलाच गावामध्ये कल्पना देण्यात आली होती त्यामुळे हरभरा कापण्याचे काम सुरु  झालेले असताना सुद्धा नागरिकांनी आपल्या बालकाला ना चुकता रविवार रोजी पोलिओ चे लसीकरण करून घेतले.सकाळी लवकर येऊन लसीकरणाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते मारोतराव मेटांगळे,शालेय व्यवस्थापन समिती चे मा.शिक्षणतज्ञ नितीन अग्रवाल व उपसरपंच पति पंडितराव मेटाङले यानि बालकांना पोलिओ पाजून लसीकरणाची  सुरुवात केली.कुणीही बालक लसीकरणापसुन वंचित राहू नये या उद्देशाने आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका  यानि सर्व गावभर फिरून परत विचारपूस केली व कुनि लसिकरनाचे राहिले का ते पाहणी केली व लसीकरणाकरिता कळवले,या दरम्यान गावात रस्त्याची कामे करण्या करिता आलेले कामगार यान्च्या राहुती वर जाऊन त्यांच्या बालकाचे लसीकरण केले हे उल्लेखनीय.या वेळी डॉ मंगेश विडोळ...

दिव्यांगांना न्याय देण्यात यावा -स्वाभिमानी शेतकरी संघटना

Image
दिव्यांगांना न्याय देण्यात यावा -स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा - (युगनायक न्युज नेटवर्क ) दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक ०८/०३/२०२२ रोज मंगळवार ला विशेष मोहिम राबविण्यात आली. सद्या दिनांक ०७/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीमध्ये दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे त्या नुसारच दिनांक ०८/०३/२०२२ ला मेहकर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सदरील नियोजीत ठिकाणी तलाठी यांना उपस्थित राहनेबाबत मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी पत्राद्वारे कळविलेले असतांना सुद्धा या स्थळी कुणीच उपस्थित नव्हते.सोबतच अगोदर दिव्यांग बांधवांना याची कल्पना देन्याचे सांगण्यात आले होते परंतु ते काम सुद्धा पूर्णपणे पार पडलेले दिसले नाही .ज्या दिंव्यांगांपर्यंत याची माहिती पोहोचविल्या गेली त्यामध्ये सुद्धा त्यांना आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते ...

.....आणि बुद्ध हसला.(एक चिंतन ) - सुरेश जयाजी अंभोरे

Image
.....आणि बुद्ध हसला.(एक चिंतन ) - सुरेश जयाजी  अंभोरे अर्पण..... डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या खडतर  परस्थितीतुन मार्गक्रमण करणाऱ्या यशाच्या  क्षणाला...... ऋणनिर्देश   प्रा. के. जे. इंगोले.सर (जेष्ठ साहित्यिक), महेंद्र ताजने  (कवी ) संजय अंभोरे, प्रा. अर्जुन गायकवाड, उद्धव  गायकवाड, प्रा. सुरेंद्र वानखेडे, ऍड., प्रा. मुकुंद वानखेडे,  प्रा. अर्जुन नवघरे, प्रा. सुनील अवचार, प्रा. कुणाल ताजने, ऍड. भारत  गवळी, प्रा. अर्जुन अंभोरे, प्रा.हेमंत भगत, तेजस  गायकवाड, विलास अंभोरे, प्रा. सुभाष  अंभोरे, अनिल तायडे, पंजाबराव घुगे, मनोज  खिल्लारे, रवि  खिल्लारे, आर. पी.अंभोरे, जे. एस. शिंदे सर   आणि  बुद्ध हसला.....   या जगात लोकं माणसे अनेक असतात,  वेगवेगळी असतात, शिकलेली असतात तर  काही बिना शिकलेली असतात परंतु चार लाखापेक्षा  चारच पण महत्वाची आणि  कामाची असतात. एका भल्या मोठया प्रसंगातून आम्ही गेलो होतो. काही माणसे इकडे बसलेली  होती तर काही  माणसे तिकडे बसलेली होती काही स्त्रिया इकडे  बस...

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भटउमरा येथे चित्रकला ,रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Image
 २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भटउमरा येथे चित्रकला ,रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करून  राष्ट्रीय विज्ञान दिवस  साजरा  वाशीम  (प्रतिनिधी ) युगनायक  न्युज नेटवर्क  भारतरत्न ,भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी 'रमण प्रभाव' ह्याचा शोध 28 फेब्रुवारी1928 मध्ये लावला.ह्या शोधात त्यांनी लाईट जेंव्हा वेगवेगळ्या माध्यमातून भ्रमण करत असते (स्थायु, द्रव,वायू )तेंव्हा तिचा वेग व गुणांमध्ये बदल जाणवून येतो  या शोधामुळे भारताच्या प्रगतीला कलाटणी मिळाली . तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्व देशभर साजरा केला जातो.यादिवशी वाशिम पासून नजीक असलेल्या भटउमरा जिल्हा परिषद शाळेत विज्ञानावर आधारीत रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत 4 थी,5 वी,6वी ,7वी तील विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता.विज्ञान विषय शिक्षक श्री.समाधान गि-हे सर यांनी आयोजन केले होते.यास शाळेचे मुख्याध्यापक मोहन कांबळे सर,,तंत्रस्नेही शिक्षक मोहन देवळे सर ,इंगळे मॅडम,धुळे मॅडम,सरनाईक मॅ...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हद्य सम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणा-या उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत यांनी जाहीर माफी मागावी याबाबत.

Image
    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणा-या उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत यांनी जाहीर माफी मागावी देऊळगावं राजा    (युगनायक न्युज नेटवर्क)  तहसिलदार साहेब, देऊळगांव राजा, यांना निवेदणाद्वारे वंचित बहुजन आघाडी तालुका समितीच्या वतीने  जाहीर माफी मागावी असे आवाहन करण्यात आहे सविस्तर वृत्त असे की  दि 28/02/2022 रोजी खामगांव येथे महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी क्राँग्रेस व अन्यकाही सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात जाहीर सभेप्रसंगी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारस म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केले. यामुळे सर्व देशवाशीयांच्या भावना दुखावलेल्या आहे. तरी अशा बेधुंद वक्तव्य करणा-या मंत्र्याच्या जाहीर निषेध करतो.  महापुरुषाच्या घरात जन्माला येणे ही अभिमानाची गोष्ट असली तरी ती मोठी जबाबदारी असते. तो वारसा टिकवणे त्याहुनही मोठी जबाबदारी असते. आपल्या मर्यादा शक्ती माह...

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे – राज्यपाल भगत   सिल्व्हासा येथील निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प अनुकरणीय मुंबई ,(युगनायक  न्युज नेटवर्क ) दि. 21 : सध्याच्या युगात नवसंशोधन, नवसृजन व विकास अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून नवोन्मेष व नवसृजनाची अपेक्षा आहे. शासनातर्फे स्टार्टअप उपक्रमांना मदत केली जात आहे. अशावेळी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. दादरा नगर हवेली प्रदेशातील सिल्व्हासा येथे मुंबई विद्यापीठाशी संलग्न श्रीमती देवकीबा मोहनसिंहजी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच हवेली इन्स्टिट्यूट ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च या संस्थेचा वार्षिकोत्सव तसेच नव्या इमारतीच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिल्वासा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फतेहसिंह चौहान, दीव आणि दमणचे खासदार लालूभाई पटेल, सिल्वासा नगरपरिषदेचे अध्यक्ष राकेशसिंह चौहान, लायन्स क्लब ऑफ सिल्वासा चॅरिटे...

धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीर लक्ष्मीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे संपन्न

Image
  धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीर  लक्ष्मीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे  संपन्न बीड. (प्रतिनिधी ) युगनायक न्युज नेटवर्क   भारतीय  सत्यशोधक  महासंघ आणि  बौद्धमय  भारत निर्माण अभियान अंतर्गत धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि २०फेब्रुवारी रोजी दुपारी २:००वा. डॉ  बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह बीड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजनाचा  मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील धर्मपरिवर्तन केलेल्या नवदीक्षिताना धम्म कळावा व प्रत्येकाने धम्माचे अनुसरन करून इतरांना दीक्षित होण्यासाठी मार्गदर्शन करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते या कार्यक्रमाचे  उदघाटन अमरसिंह  ठाका  (महाराष्ट्र संघटक  सत्यशोधक  ओबीसी परिषद )यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  धम्मप्रचारक  लक्ष्मीकांतशिंदे अध्यक्ष भारतीय सत्यशोधक  महासंघ हे होते तर  कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विष्णु  कांबळे बीड जिल्हा अध्यक्ष भारतीय  बौद...

कस्तुरवाडी येथे मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण

Image
कस्तुरवाडी येथे मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण  बदनापूर (प्रतिनिधी) युगनायक न्युज नेटवर्क दि.२०/२/२०२२ वार रविवार रोजी मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण गाव कस्तुरवाडी ता.बदनापूर जिल्हा जालना  या ठिकाणी पार पडला त्यावेळी शाखेचे उद्घाटन उपस्थित मातंग पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.भैय्यासाहेब गवळी, प्रमुख अतिथी प्रदेश अध्यक्ष सुरेश कांबळे, प्रमुख पाहुणे प्रदेश उपाध्यक्ष अमरजित मुजमुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश अंभोरे  पैठण तालुका  जिल्हा औरंगाबाद  तसेच उपस्थित तालुका कार्याध्यक्ष सचिन ससाणे, तसेच शाखा अध्यक्ष राहुल अंभोरे, शाखा उपाध्यक्ष प्रमोद अहिरे ,सल्लागार बाळू अंभोरे, सचिव दिलीप अंभोरे,कोषाध्यक्ष विकास अंभोरे, कार्याध्यक्ष भरत अंभोरे तसेच बदनापूर तालुका कार्याध्यक्ष अनिल अंभोरे, तालुका उपाध्यक्ष सुनिल आठवले ,दीपक गायकवाड, संतोष इचके गावकरी मंडळी व समाज यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला

अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबतचे असंविधानिक प्रस्ताव नाकारण्याची मागणी

Image
  अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबतचे  अ संविधानिक प्रस्ताव नाकारण्याची मागणी नांदेड  (युगानायक न्युज नेटवर्क ) दि. 4 -अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट ब) दर्जाच्या कनिष्ठ अधिकारी यांना प्रदान करण्याचा गृहविभागाचा प्रस्तावित असंविधानिक व अन्यायकारक प्रस्ताव नाकारण्यात यावा, अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्ह्याचे/तपासाचे खटले चालवण्यासाठी जलदगती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास हा निपक्षपातीपणे व जलदगतीने होण्यासाठी आणि दलित-आदिवासी जमातीवर होणार्‍या अत्याचाराविषयी न्याय जलदगतीने मिळण्यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा निर्माण करावी, आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत आज अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट संरक्षणार्थ स्थापन झालेल्या अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट संरक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व समन्वय समितीचे अध्यक्ष तथा आंबेडकरी...

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

Image
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी मुंबई , (युगानायक न्युज नेटवर्क ) दि. ४ :- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांक...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला

Image
  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला संवाद युगनायकाचा प्रतिनिधी मंगेशी गांधी पुणे महर्षीनगर-सॅलसबरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.२८ व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट महर्षीनगर आयोजित महिलांसाठी हळदी-कुंकू  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सौ.सीमा राहुल गुंड व प्रणाली गुंड यांनी केले होते.आनंदमय वातावरणात महिलांना वाण (भेट वस्तू) देऊन सन्मानित करण्यात आले.महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा मृणालिनी ताई वाणी,यश्रश्री कानिटकर,रझिया काझी,जयश्री दिक्षित,नलिनी गुंजाळ,निलिमा शिरोळे,अंजली गुंड,दिपाली गुंड, प्राजक्ता गुंड,सीमा गुंड (गोरड) उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला भगिनींनी व मित्र मंडळी यांनी खुप मेहनत घेतली.

डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करून संबंधितवार कार्यवाही करण्याची मागणी

Image
डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करून  संबंधितवार  कार्यवाही करण्याची  मागणी   बुलढाणा (प्रतिनिधी ) युगानायक न्युज नेटवर्क  डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी करा अन्यथा तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी 1/2/2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बुलढाणा यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की डोड्रा तालुका देऊळगाव राजा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना डांबरीकरण व गावातून सिमेंट रस्ता झाला आहे हे काम मुदतीपूर्वीच खराब झाला असून गावातील सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून रस्त्यावर गावातील शाळेजवळ मोठमोठाली खड्डे पडले आहे मुख्य सांडपाण्याची विल्हेवाट लावलेले नसून दोन्ही साईट च्या नाल्याचे काम अपूर्ण आहे त्या सांडपाण्याच्या नाल्याची विल्हेवाट लावावी त्या ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता आहे या संपूर्ण प्रकाराची तपासणी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संबंधित ...
 संक्षिप्त थोडक्यात  पाहिजेत दैनिक पब्लिक लिडर  महाराष्ट्रभर दैनिक  पब्लिक लिडर  चा  जनसंपर्क वाढवा साठी खालील पदाकरीता  होतकरू पत्रकार म्हणून  काम करणार उमेदवार  संपूर्ण महाराष्ट्रभर  पाहिजेत  उपसंपादक  - १ उमेदवार पत्रकारितेचा पदवीधर असावा साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्रात मागील किमान २वर्षाचा  अनुभव व संगणाकाचे ज्ञान असणे  आवश्यक. जिल्हा प्रतीनिधी  (महाराष्ट्रातील प्रति जिल्हा -१)  महाराष्ट्रतील जिल्ह्यानुसार जनसंपर्क असावा पत्रकारितेचा  किमान किमान ४ वर्षाचा अनुभव, पत्रकारिता या व्यावसायिक क्षेत्राची जाण असणे आवश्यक आहे. जाहिरात प्रतिनिधी  (महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात -१)  जाहिरात क्षेत्रात काम करण्याचा  अनुभव असणे  गरजेचे , निवड  झालेल्या जिल्ह्यात जनसंपर्क असावा जाहिरात क्षेत्रात मेहनत करण्याची  तयारी  असावी तालुका प्रतिनिधी (महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात -१)  निवडनिर्भीडपणे  तालुक्यात पत्रकारिता करण्याचा  अनुभव असावा जनसंप...

युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरावी - संचालक सूर्यकांत फाळके

Image
  युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरावी - संचालक सूर्यकांत फाळके  वाशीम      (युगनायक  न्युज नेटवर्क ) :- युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरून आपला विकास करावा जेणे करून आपण आर्थिक स्वयंपूर्ण होऊ असे प्रतिपादन सूर्यकांत फाळके संचालक SBI RSETI वाशीम यांनी दहा दिवशीय बकरिपालन प्रशिक्षण समारोप प्रसंगी व्यक्त केले SBI RSETI च्या वतीने ग्राम बेलखेडा येथे दहा दिवसाचे बकरी पालन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते त्या प्रशिनाचा समारोप नुकताच झाला शेवटच्या दिवशी बाह्या परिक्षक श्री डॉ काळे सर व श्री डॉ अमोल अवचार सर यांनी अत्यंत शिस्तीत प्रशिकणाथ्री ची परीक्षा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व त्या नंतर त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या वेळी RSETI चा कर्मचारी वर्ग उपस्थित होते मार्गदर्शक म्हणून नारायण महाले यांनी काम पाहिले.

संपुर्ण वर्षभर राबविणार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम

Image
  संपुर्ण वर्षभर राबविणार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम जउळका रेल्वे ( प्रतिनिधी सुरज अवचार ) केंन्र्द सरकारच्या कला व क्रिडा विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक भारत श्रेष्ठ भारत तसेच अमृत महोत्सव स्वांतत्र्याचा हा उपक्रम सर्व शाळा काॅलेज महाविद्यालय यामधुन राबविण्यात येत आहे.          परंतू श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिमचे तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी ह्या शासनकृत स्तुत्य उपक्रमाची सुरूवात दि. १५ आँगस्ट २०२१ ते १५ आँगस्ट २०२२ या संपुर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज न चुकता नाविन्यपुर्ण माहितीने व मनोरंजक पद्धतीने आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या युट्युब चँनलच्या माध्यमातुन विद्यार्थानपर्यंत पोहचवली.            एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत महाराष्ट्र व ओडीसा राज्याबरोबरच भारतातील संपुर्ण घटक राज्यांची माहिती प्रश्नमंजुषेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या वेबसाईटवर केली तसेच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची माहिती सुद्धा प्रश्नमंजुषे...

"एक भारत श्रेष्ठ भारत" उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा व वत्कृत्व स्पर्धा उपक्रम श्री शिवाजी डि.एड.काँलेज मध्ये संपन्न. "

Image
 "एक भारत श्रेष्ठ भारत" उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा व वत्कृत्व स्पर्धा उपक्रम श्री शिवाजी डि.एड.काँलेज मध्ये संपन्न.  जउळका रेल्वे ( प्रतीनिधी सुरज अवचार )युगनायक  न्युज नेटवर्क  केंन्द्रसरकारच्या   कला व क्रिडा विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक भारत श्रेष्ठ भारत तसेच अमृत महोत्सव स्वांतंत्र्याचा हा उपक्रम सर्व शाळा काॅलेज, महाविद्यालय मध्ये राबविण्यात येत आहे. श्री शिवाजी डि.एड. काॅलेज वाशिम येथे  एक भारत श्रेष्ठ भारत याअंतर्गत दि.२४/०१/ २०२२ रोजी प्रश्नमंजुषा उपक्रम व वत्कृत्व स्पर्धा दि.२८ /०१ / २०२२ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा.सौ. अनिताताई सरनाईक यांनी या कार्यक्रमांचे उद्घाटन करुन दिपप्रज्वलन कले.  वत्कृत्व स्पर्धेमध्ये अनेक छात्रध्यापकांनी सहभाग घेउन महाराष्ट्र व ओडीसा राज्यांची संस्कृती व परंपरा या विषयावर आपले विचार व्यक्त केले . प्रास्ताविक काॅलेजच्या प्रशासकीय अधीकारी सौ.भारती देशमुख यांनी केले . या प्रसंगी मा.सौ.अनिताताई सरनाईक नी इपले विचार व्यक्त करतांना त्या म...

कामगार कल्याण केंद्र वाशिम येथे मराठी भाषा संवर्धन पंढरवाडा कार्यक्रम अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनी व व्याख्यान कार्यक्रम

Image
 

राष्ट्रपुरुष शहीद टीपू सुलतान यांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - लोकसेना

Image
  राष्ट्रपुरुष शहीद टीपू सुलतान यांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा   लोकसेना बीड प्रतिनिधि   (युगनायक  न्युज नेटवर्क ): राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पहिले स्वतंत्रता सेनानी शहीद टीपू सुलतान यांच्या बद्दल केलेल्या देशद्रोही वक्तव्याचा व शाब्दिक विटम्बनेचा लोकसेना संघटना कड्या शब्दात जाहिर निषेध करत असून जो पर्यन्त यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही जे होईल ते होईल असा इशारा लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे. देशात राजकीय नेत्यांकडून धर्म व जातीनुसार प्रत्येक स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचा बटवारा करण्याची वाईट सवय लागलेली आहे भारत देशाचा प्रत्येक राष्ट्रपुरुष, स्वतंत्रता सेनानी व शहीद ए आज़म हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या ऋदयस्थानी असतो मग ते महात्मा गाँधी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आज़ाद महात्मा फुले, शहीद टीपू सुलतान, लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप व इतर कोणतेही राष्ट्रपुरुष असो हे सर्वांचे आदर्शस्थानी असतात परंतु मुंबई येथील एका ...

असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश

Image
असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश  बुलढाणा (प्रतिनिधी ) दि २७ रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व पक्षनेत्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ सौ सविता ताई मुंडे व महेश भाऊ देशमुख जिल्हा सचिव देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष मधुकर भाऊ शिंदे ज्येष्ठ नेते अनिल खरात सर जनार्दन चित्ते कर जगन वाकोडेराजा तालुका उपाध्यक्ष संदीप खरात मच्छिंद्र भालेराव तालुका सचिव संदीप भाऊ झोटे विनोद पटावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खालील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला गजानन भाऊ शेळके संदीप भाऊ जायभाये यांच्या पुढाकाराने आनंता शेळके सुरेश माटे दीपक म्हस्के सारंग चीतेकर रामेश्वर शेळके बबन मांडे सतीश मुंडे साहेबराव मस्के संतोष शेळके गणेश शेळके रामेश्वर बंकट शेळके संतोष शेळके विजय शेळके योगेश मांटे सुरेश कारभारी मांटे गजानन मांटे संतोष मस्के भीमराव मस्के ज्ञानेश्वर मस्के मुकिंदा चित्तेकर विजय मुंडे संतोष कांबळे आद...

ग्राम ढोरखेडा येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी नारायण मिटकरी

Image
ग्राम ढोरखेडा  येथील  तंटामुक्ती  अध्यक्षपदी  नारायण मिटकरी रिसोड (प्रतिनिधी )   ग्राम ढोरखेडा  येथील  तंटामुक्ती  अध्यक्षपदी  नारायण मिटकरी  यांची  निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी च्या राज्य महिला सदस्यां  किरणताई  गिऱ्हे ऍड. भारत गवळी, उत्तमराव झगडे   यांच्या वतीने  नारायण मिटकरी यांचा  सत्काराचे  आयोजन किरणताई  गिऱ्हे यांच्या निवासस्थानी करण्यात आले  होते त्यांच्या पुढील  तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी  सर्वांच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या