वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हद्य सम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणा-या उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत यांनी जाहीर माफी मागावी याबाबत.

 

 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणा-या उर्जामंत्री डाँ. नितीन राऊत यांनी जाहीर माफी मागावी



देऊळगावं राजा   (युगनायक न्युज नेटवर्क) 

तहसिलदार साहेब, देऊळगांव राजा, यांना निवेदणाद्वारे वंचित बहुजन आघाडी तालुका समितीच्या वतीने  जाहीर माफी मागावी असे आवाहन करण्यात आहे सविस्तर वृत्त असे की  दि 28/02/2022 रोजी खामगांव येथे महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी क्राँग्रेस व अन्यकाही सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात जाहीर सभेप्रसंगी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारस म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केले. यामुळे सर्व देशवाशीयांच्या भावना दुखावलेल्या आहे. तरी अशा बेधुंद वक्तव्य करणा-या मंत्र्याच्या जाहीर निषेध करतो. 

महापुरुषाच्या घरात जन्माला येणे ही अभिमानाची गोष्ट असली तरी ती मोठी जबाबदारी असते. तो वारसा टिकवणे त्याहुनही मोठी जबाबदारी असते. आपल्या मर्यादा शक्ती माहीती असतांना देखील त्या नावाला वलयाला कोठेही धक्का लागु न देता ते जपायला मोठा आत्मभान आणि विवेकी पणा लागतो. हा विवेकी पणा ख-या अर्थाने डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारीक वारस आदणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे कडे आहे. आंबेडकर या नावाला अस्मीता नाही. तर करोडो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अन अशात थेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य असल्याने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशातील एक महत्वपुर्ण राष्ट्रीय नेतृत्व आहे. त्यामुळे नितीन राऊत यांनी आम्ही खरे वारसदार आहोत हे समाजाला कितीही हात कापुन रक्त दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. आणी जयभिम हा स्वाभिमान आहे. तो कोणत्याही हुजरेगीरी करणा-या तोंडात शोभत नाही. ते या देशातुन वंचित घटकाच्या जनतेच्या न्याय हक्काच्या तथा त्यांना स्वाभिमान सत्तेत बसविण्यासाठी कार्य करीत आहे. व राष्ट्रीय राजकरणात यांची उंचीही मोठी असल्यामुळे प्रस्थापित घरानेशाही जपणा-या व निष्ठा ठेवणा-याच्या लोकांच्या पोट सुळ उठला आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांना स्वतःच्या उर्जा खात्यातील भोंगळ कारभार दोन वर्षात निट संभाळता आला नाही. केंद्राच्या खाजगीकरणाच्या विरोधात तोंडातुन एकही शब्द काढला नाही. MSEB मधील बँकलाँग आपल्याकडुन भरुन निघत नाही. राज्यात अचानक मुंबईत झालेल्या शटडाऊन यांना माहीत नसतो. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत यांचे सत्ताधारी मित्र पक्ष यांना बोलु देत नाही. यांचा अपमान सर्वांसमोर होतो. तेव्हा हे सर्व लाचार होऊन सहन करतात. म्हणुन यांची वैचारीक वारसदार श्रध्देय बाळासाहेब आंबेकरांवर बोलण्याची किंवा त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही. तरी उर्जा मंत्री नितीन यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर माफी माघावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. 

सदर निवेदन उध्दव भगवान वाकोडे ता अध्यक्ष दे. राजा यांच्या अध्यक्षतेखाली  देण्यात आले 

 

                                                                            


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू