.....आणि बुद्ध हसला.(एक चिंतन ) - सुरेश जयाजी अंभोरे

.....आणि बुद्ध हसला.(एक चिंतन )

- सुरेश जयाजी  अंभोरे








अर्पण.....
डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
यांच्या खडतर  परस्थितीतुन मार्गक्रमण करणाऱ्या यशाच्या  क्षणाला......




ऋणनिर्देश


 प्रा. के. जे. इंगोले.सर (जेष्ठ साहित्यिक), महेंद्र ताजने  (कवी ) संजय अंभोरे, प्रा. अर्जुन गायकवाड, उद्धव  गायकवाड, प्रा. सुरेंद्र वानखेडे, ऍड., प्रा. मुकुंद वानखेडे,  प्रा. अर्जुन नवघरे, प्रा. सुनील अवचार, प्रा. कुणाल ताजने, ऍड. भारत  गवळी, प्रा. अर्जुन अंभोरे, प्रा.हेमंत भगत, तेजस  गायकवाड, विलास अंभोरे, प्रा. सुभाष  अंभोरे, अनिल तायडे, पंजाबराव घुगे, मनोज  खिल्लारे, रवि  खिल्लारे, आर. पी.अंभोरे, जे. एस. शिंदे सर


 आणि  बुद्ध हसला.....


 या जगात लोकं माणसे अनेक असतात,  वेगवेगळी असतात, शिकलेली असतात तर  काही बिना शिकलेली असतात परंतु चार लाखापेक्षा  चारच पण महत्वाची आणि  कामाची असतात. एका भल्या मोठया प्रसंगातून आम्ही गेलो होतो. काही माणसे इकडे बसलेली  होती तर काही  माणसे तिकडे बसलेली होती काही स्त्रिया इकडे  बसलेल्या होत्या तर  काही स्त्रिया तिकडे बसलेल्या होत्या. पण  माणसातील माणुसपण  जपणारे  आम्ही मात्र मध्येच उभे होतो. आणि  आम्ही उघड्या डोळ्याने पाहत होतो की बसलेल्यांपैकी  काही इकडे  विरोधक होते तर काही तिकडे  विरोधक  होते. मानवातालं माणुसपण  जपणारे  आम्ही मात्र माणुसपण  ओळखूनच  पोटतिडकीने  बोलत होतो. पण आम्हाला काही ऐकणारे मात्र जनवरासारखी  भासत होती. कारण  काही शिकलेल्यात  न शिकलेली  जनावरे  बसलेली  होती तर  काही पलीकडच्या बाजूलाही बसलेली  होती.

 सूर्याच्या प्रकाशाला  सत्य प्रमाण माणूनच वास्तव आज  प्रथमच  धाडस करून  पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळाल्यागत आनंद  व्यक्त करत होत. उद्याचा अंधार नष्ट करीत प्रकाश  निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही जेव्हा बोलू लागलो तेव्हा वरचा  तपणारा सूर्यही जमिनीला गरम  करीत  होता. अन्याय, अत्याचार, मान, अपमान, संघर्ष, पाहणारे डोळेही जीवन जगत असतात. आणि  जीवनाच्या अंती काय घडते हे पाहणारे काही श्वापदांचे  डोळे मात्र शेवटच्या अंतिम त्या वातावरणाला कायम प्रसंगालाही पाहण्यासाठीच  गर्दी करत  असतात.

 तो क्षण पाहुण आई, वडील, भाऊ, बहिणीच्या डोळ्याच्या कडेला  आलेलं पाणी ही कदाचित  प्रेतासोबत  खेळणाऱ्या त्या क्षणाला  कदापीही  माफ करणार नसतं. आज  मात्र त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस काही का होईना पण तिथे पास  झालेला होता. नापास मात्र जातीशी  खेळणारी  माणसेच  तिथे झाली होती. हे प्रकट  होतांना स्पष्ट दिसत  होत. जुलूमाच्या खाईत  पडलेल्या माणसाला सुद्धा विचार असतात  पण वैचारिकतेने परिपूर्ण असणाऱ्या माणसाला मात्र तो क्षण  अगदी अस्वस्थ व बेचैन करून  जाणवणाराच भासत  होता.

 हृदयाला चटका लावून जाणारी  ती परिस्थिती आम्ही त्या दिवशी खरोखर अनुभवत होतो. इतिहास घडविण्याची वाट पाहणारे आज  माणुसपणाच्या  नजरेने  इतिहास घडत असतांना पाहत होतो प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण होणारे अशांतीचं  वादळ जणुकाही आज  शांत  होणार होत. माणसानी निर्माण केलेले जातींचे कंगोरे तोडण्यासाठी ज्याचा जीव जातो त्याला पाहण्यासाठी तर  सोडा पण त्याच्या माती झालेल्या राखेसाठी सुद्धा स्मशानात जमलेले  काही माणसे व काही स्त्रिया ह्या त्या ठिकाणी सुद्धा जातीचं गाठोडं सोडत  नसतात  काय ही शोकांतिका ?

 आज  जातीच्या अस्मितेची  मुळं खणून काढणारा  तो दिवस होता. कदाचित  त्या दिवसाला समतेची  प्रतीक्षा कित्येक वर्ष व दिवसापासून लागलेली असावी. आशेचा किरण जीवनात एक नवी  उर्मी देऊन जातो पण निर्जीव असलेल्या प्रेताचा दोष व अपमान लक्षात घेता  ठरलेल्या पाचव्या दिवशी देखील  कोण पाहु शकतो ? अशा  प्रश्नानी  थैमान घालत जणू  त्या दिवशी आमच्या मनावर एक प्रकारचा जणू  आघातच झाला होता. हृदयात कोरून ठेवलेल्या अशा  मनावर  झालेल्या आघाताचे  चटके  कायम मनावर  झालेल्या डागाप्रमाणे  जिव्हारी झोंबत होते हे वास्तव आहे.


 माणसाच्या जीवनात झालेलं कोणत्याही गोष्टीचं शोषण  हे शेवटी चित्त थरारक असतं ओजस्वी अनुभवाच्या  मनात  ते मात्र सलत  असतं, संकटाच्या  वळणावर आणि  सुख दुःखाच्या सावलीत  बसणाऱ्याला मात्र ते सारखं बोचत असतं. कुठेतरी खुपत असतं, अशीच  सुख  दुःखाची  वळणे  घेत  येणारी आयुष्ये  शिकत  शिकतच  मोठी  होत असतात. एक दिवस त्या अंतिम क्षणाचा ओघ  थांबतो.  ते आपल्याला माहित देखील  होत नाही ही पर्वणी  समजण्यासाठी  लागते ती फक्त मनाचीच  ताकद... अशा ह्या मनाची  ताकद  झालेल्या समतेला  कोणीही नष्ट  करू  शकत  नाही.

 व्यक्तीच्या किंवा स्त्रियांच्या मनोवृत्तीची  अनेक उदाहरणं सापडतील पण समतेच्या नावासाठी  तडफलेली  मने मात्र अद्याप सापडत  नाहीत. ती निर्माण करण्यासाठी आजही  दिवस  रात्र एक करावी  लागते. उगवणारा सूर्य रोजच  समतेचा  प्रकाश  घेऊन उगवतो खरा  पण समतेच्या या सूर्यप्रकाशात राहणारी माणसे मात्र समतेच्या विचारांची रोजच  उपजतील  असे नाही. नितीच्या नावावर   राक्षस  उपजलेली  प्रवृत्तीची  माणसे मात्र आपल्याला क्षणाक्षणाला आढळतील. हे  दुर्दम्य शल्य कुणास सांगावं विषयावासानेच्या झोतात चाललेला  हा खेळ  पाहण्यासाठी कित्येकांचीच  वर्णी लागलेली असतें. सत्याचं हे केवढं  अप्रतिम रूप आहे. हे स्पष्ट पणाने  व्यक्त करणही तितक अवघड  असतं.
                         माणूस म्हणून  जगणं जेवढ खरं आहे  तेवढं  विषमतेच्या  जगात  मरणही  जोखीम  होऊन बसलं आहे. याची प्रचिती  जागृत  अवस्थेतही जाणवते  रोजच्या उदर  निर्वाहाच्या प्रश्नात  ज्ञानाच्या भुकेचं  उत्तरही सापडत नाही असं हृदयस्पर्शी जीवन जगत असतांना विस्कळीत झालेली माणसाच्या मनाची  घडी  अद्यापही बसत नाही असा हा रोजच्या आठवणीचा दिवस  एका मागून एक कधी  निस्तेज होऊन जातो.याची  देखील कल्पना करवत नाही.

संध्याकाळी शांत  पडल्यावर डोळा लागताच  सुरु होतो, वेदनेचा  परिपाठ, तेव्हा  स्वप्नातही दिसू लागतात दुःखाची  वलयं.... काय करावं.... सुखाच्या पर्यायाची  जागा घ्यावी लागते  फक्त आशादायी असलेल्या  स्वप्नांना.... तेव्हाच जाग येते, डोळे उघडतात  नि बैचेन  होऊन जातो, वास्तवात, असलेलं  रहस्य  उलगडतं....


 एका क्षणात  आपण सावरतो.... आणि  शोधु  लागतो  स्वप्नात हरवलेली  सुखाची  चादरं ... सापडत  नाही कुठेच  कारण  आपण वर्तमानात.... प्रयत्नांची पराकाष्ठा करत  करत  माणसे जीवन  जगत  आली  ईथपर्यंत. परंतु  आजही  रिता वाटतो आहे मोकळा  श्वास... एका क्षणी  पाहिजे तसं कायम  इथे  राहणे  कुणाच्याही हाती नसतं. काळ जेव्हा जाब विचारतो  माणसाला तेव्हा आपलं सिंहावलोकन  करणारी  माणसेच होत असतात दुःखी, कारण  काळाच्या पडद्याआड  झालेली असतें अस्मिता आपली.  एकापेक्षा एक वरचढ  दुःखे  असतात  आपली पण सावरणारा क्षण  मात्र कुणाचा असतो  हाती.कुणाच्या मायेच्या हळव्या स्पर्शाने ऊर्जा निर्माण व्हावी तसें जीवनात  येणाऱ्या प्रसंगाचे  स्वरूप असतें पण  त्या पाठोपाठ जीर्ण होणाऱ्या मानसाच्या शरीराकडून  व प्रत्येक अवयवाकडून  आपण काय बोध  घ्यावा याची  चाहूल  कधी  अनुभवली  आहे का ?

 आज  माणसाने माणुसकी 
सोडून समाजाची  लक्तरं  दाखविण्यास  बदमाशी  केली. याला कारणीभूत फक्त मानवाचं  वर्तनच आहे. जो तो स्वतःच  मालक  होऊन बसतो. शुद्ध चारित्र्याच्या बाजारात देखील  हे अश्लील नवखेपणाचं  बाडं चाळत आलेला हा माणूस  निकामी पणाचा पुतळा होऊन बसलाय. अशा  खेदजनक  माणूस संस्कृतीला तरी  कसा  शोभेल ?

 मोहाच्या जाळ्यात मात्र निपचित पडुन  राहतात म्हणजे पृथ्वी देखील  याच  सारांशाचे भेदक  रूप अनुभवते  आहे. निसर्गाने निर्माण करून  दिलेल्या
स्वातंत्र्याला  मात्र तोड नाही. वेळेची  संरजामशाही  इथे मात्र कुठेच नाही. ज्ञान संजीवनीचं अमृत  फक्त ज्ञानवंतानांच सापडते. आणि  कर्माची  आसक्ती  नसलेल्यांना  बोधिसत्व  होता येते.....

 विश्वासपात्र असलेली  माणसेच विश्वास वाढवत असतात. एकमेकांचा आणि  विश्वासाचं संवर्धन  करणारी  मनेचं  जाणू शकतात विश्वास  मूल्य, वात जेव्हा तेलाला सोबत घेऊन  जळते  तेव्हा त्यांचं एकच  ध्येय असतं आणी  ते म्हणजे दोघांच्याही एकरूपतेतं  प्रकाशमान  होण्याचं व आपल्या त्या निर्माण झालेल्या प्रकाशात उपजत असतात पुन्हा विश्वास पात्र मनेच,अश्या प्रसंगी वावरते सगळीकडे निरामयता  व हतबल झालेल्या मानवाला  कदाचित  त्या प्रकाशात  दिसतो. एखादा  मार्ग व त्याचे होत असते, सत्याकडेच  मार्गक्रमण झालेल्या दुःखाचं  भावनात्मक ओझं पाठीवर  घेऊन प्रवास करतांना मनं  हलकं करणारे  मात्र कमी  भेटतात. आलेला  अनुभव मात्र खुप  त्रासदायक असतो. त्या त्रासाची चीड  आजही  आम्हाला जाणवत आहे . आम्ही  त्या रक्ताळलेल्या मनावर  उपचार  करू लागतो  तेव्हा कुठे   त्या मनाला  विश्वासाची  ताकद  मिळते.

 व त्या मिळालेल्या शक्तीच्या म्हणजे बळाच्या  जोरावर  आजही  ते मन  निर्भय पणाने चालते आहे. स्वाभाविकपणे विसरलेल्या काही आठवणी जेव्हा काही प्रसंगाने ताज्या होतात तेव्हाच कळतो  खरा  जीवनाचा अन्वयार्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला क्षण व प्रसंग जेव्हा मानवतेकडे घेऊन  जातो, तेव्हा त्या निर्मितीचं महत्व  वाढत जाऊन तुमच्या त्या खऱ्या  प्रतिमा जगाच्या अंतःकरणाच्या न म्हणता जीवनाच्या हृदयाच्या आरश्यात पाहावयास मिळतात. हे गांभीर्य तुम्ही सुद्धा मन  मोकळे पणाने वाचत असता.तेव्हा तुमचीही  अस्मिता कुठेच 
डगमगत नाही. एखाद्या निर्भीड प्रसंगा सारखी व त्याला जोड असतें ती फक्त मैत्रीच्या करुणेची....

 रोजच्या इमानदारीच्या मिळकतीवर जगणंही सोपं नसतं उपाशी राहून काढलेला  क्षण  मात्र ईमानदारीच्या मिळकतीला  मात्र सुखावून  जातो का कुणास ठाऊक ? विकत घेऊन  मिळविलेल्या समाधानापेक्षा उपाशी  दिवस  काढून जगलेल्या क्षणाला  तोड नाही. आजही  कित्येकं जीव आशेवार  जगतात आणि  मरतात पण सम्यक आजीवचं  साधं सूत्र त्यांना अनुभवता  येत नाही.


 शिक्षणाच्या  तळमळीतून साकार झालेला तो क्षणही असाच असतो. स्वतःच्या विवेकाच्या जोरावर  यशस्वी झालेली माणसेही दिसतात, आणि  विस्कटलेल्या क्षणाची घडी  आयुष्यात जेव्हा ते बसवतात तेव्हा तो खऱ्या  दारिद्र्याचा मोबदला न मोजता  येणारा असतो.  कधी  कधी  माणूस  माणसांच्या पात्रातेची किंमत मोजतो पण  एखाद्या माणसानेच  केलेल्या सहकार्याची  उंची  कोणालाही मोजता  येणारी नसते. आजच्या दुष्परिणामाची  विघातकता पाहता ही केवढी  भयंकर आहे याचा विचार  करणेही  कठीण  वाटते.

 सत्याला सांगता सांगता  वास्तवतेच्या तत्वालाही दमछाक  झाल्यासारखं होत. पण शरीरातला प्रत्येक रोम हा आम्हाला स्वाभिमान जिवंत ठेवण्यालाच भाग  पाडतो. आम्हावर झालेल्या संस्काराची  सत्य चीड  आम्हाला अन्यायात तडफडू  देत नाही. कारण  महामानवांनी  दिलेल्या ज्ञानाचं बळ  आम्हाला नेहमी जतन  झालेल्या सत्याला, बुद्धीच्या कौशल्याला  नेहमी उत्तेजित करत. ही जीवनशैली जगतच आम्ही मोठे झालो. स्वाभिमानाच्या शौर्याची  उंची  गाठतच  आम्ही यशस्वीही झालो केवळ मूठभर  लोकांच्या नाही तर  सर्वांच्याचं  विकासाची  सावली देखील  झालो. प्रगतीच्या यशाची  शिखरं ही मोजत  गेलो. पण कुठेच  मात्र आमचे  मन ढळले नाही. कित्येक दिवस  आले आणि  गेले पण महामानवांवर बितलेल्या क्षणाची  उणीव आजही  भासवते. जागोजागी झालेला त्यांचा अपमान आजही आमचं  रक्त चेतवते. एका बलाढ्य  संगरात आजही आम्हाला उभं करते. हिच  ती कळकळ जिच्या वेदनेतून अस्वस्थ करणारी  मानसिकता आमच्या प्रबळ  शक्तीचं रूप धारण करते. इतिहासाच्या वेदनेची लाज राखावायस  सांगते. माणसाविषयीं किंवा स्त्रियांविषयी अतिअल्प असणारी सहिष्णूता अविरत वाढवते व एक ध्यास आणि एक जिद्द मजबूत करते.

 मरणाच्या दारात उभा असलेला  माणूस जसा  निस्तेजं आणि  हतप्रभ होतो.त्याप्रमाणे विना शिकलेल्या  माणसाची  अवस्थाही होत असतें. एकमेकांवर  अवलंबून असणाऱ्या माणसाचा  हा खेळ अविरत काळापर्यंत चालत आलेला  आहे. समृद्ध आणि  प्रगतीशील असलेल्या काळातही मरणाचीही  विदर्ण अवस्था अनुभवतांना आजही  माणूस जीवन जगण्याच्या ओशाळं नजरेनं मानवातील  हरवलेला  पुन्हा माणुस पाहण्याकरिता कदाचित  बैचेन  झालेली नजर कुठेतरी शोधत -शोधत कदाचित  माणुसकी  सापडेल या कडेच  लक्ष  देऊन बसलेला  आहे.

 कधी  कधी  आपल्या हिताच्या संवार्धानासाठी  माणूसच  माणसालाही मारत आहे. नव्हे ती जर  आजच्या  घडीला  गरज झाली तर मानवतला व
जनावरातला फरक  कोणता ओळखावा, आपण वाचत आलेली  ही परिस्थिती लक्षात घेता,नवीन शांतीचा  संदेश  घेऊन आलेली सकाळ मानवतेची फुले  उगवून मार्ग दाखवत आहे. आणि  तो म्हणजे ज्ञानाचा. या ज्ञानाच्या प्रकाशातच आम्ही नादंतो आहोत. सुखा  समाधानाने या ठिकाणी पाझरलेल्या सत्य  निर्मळतेच्या झऱ्याचं पाणी पिऊन सर्व दुःख विसरून..... तृप्त होत आहेत  अनेक जीव....

उरलेल्या जीवनात व आयुष्यात शिल्लक असलेल्या प्रश्नांची  उत्तरे देत आम्ही सजगतेच्या ईशाऱ्याला   कधी नाही पडत  कमी......
एक सेकंद, एक मिनिट, एक तास, एक दिवस आणि एक सकाळ व अंतिम एक क्षण  हे सर्व पाहुण व सर्व दुःख विसरून  माणसाला हसवणारा बुद्ध लोकांच्या प्रत्येक मनात  हसतांना आम्ही नेहमी पाहिला आहे. आणि  प्रत्येक प्राणी -मात्राच्या चरचरात तो अगदी निसर्गातही हसला आहे. कोण म्हणतो की बुद्ध जगात हसला नाही?

 बुद्धाला या जगात पुन्हा हसवण्यासाठीच  बाबासाहेब आंबेडकरांचा  जन्म झाला होता...... त्यांच्या केवळ ज्ञानाच्या ताकदीने हे घडु शकले . तर  आपण प्रत्येक मानवाच्या मनात बुद्धाचं वलयं निर्माण करू  शकत नाही का ? या प्रश्नांचे  उत्तर देऊनच आम्ही म्हणतो की, पुन्हा या काळात,या जगात सर्व  श्वासात.....सर्व मनातं ... सदोदित क्षणातं .... म्हणायला  भाग  पाडु आणि  मेलेली नाही. तर  जिवंत  माणसेच  म्हणतील की पुन्हा या विश्वात हे सर्व पाहुण... आणि  बुद्ध हसला....!


-  सुरेश  जयाजी अंभोरे

रिठद ज्ञानपर्व प्रकाशन

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू