राष्ट्रपुरुष शहीद टीपू सुलतान यांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - लोकसेना
राष्ट्रपुरुष शहीद टीपू सुलतान यांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकसेना
बीड प्रतिनिधि (युगनायक न्युज नेटवर्क ): राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पहिले स्वतंत्रता सेनानी शहीद टीपू सुलतान यांच्या बद्दल केलेल्या देशद्रोही वक्तव्याचा व शाब्दिक विटम्बनेचा लोकसेना संघटना कड्या शब्दात जाहिर निषेध करत असून जो पर्यन्त यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही जे होईल ते होईल असा इशारा लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे. देशात राजकीय नेत्यांकडून धर्म व जातीनुसार प्रत्येक स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचा बटवारा करण्याची वाईट सवय लागलेली आहे भारत देशाचा प्रत्येक राष्ट्रपुरुष, स्वतंत्रता सेनानी व शहीद ए आज़म हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या ऋदयस्थानी असतो मग ते महात्मा गाँधी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आज़ाद महात्मा फुले, शहीद टीपू सुलतान, लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप व इतर कोणतेही राष्ट्रपुरुष असो हे सर्वांचे आदर्शस्थानी असतात परंतु मुंबई येथील एका खेळाच्या मैदानाला महानगरपालिकेने शहीद टीपू सुलतान यांचे नाव देण्याचे ठरवल्यानंतर राज्यातील भाजपा नेते व खास करुन देशद्रोही नथूराम गोडसे विचाराचे देवेंद्र फडणवीस यांनी टीपू सुलतान हिंदू समाजाविरोधात होते व त्यांनी खुप अत्याचार केले असे बेताल व बेजबाबदार वक्तव्य करुन देश आणि राज्यातील दोन समाजामध्ये तेढ़ निर्माण करुन दोन समाजामध्ये फुट पाड़ण्याचा प्रयत्न केला शहीद टीपू सुलतान यांचा एकेरी शब्दात उल्लेख करुन अपमान केला फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपाई गोपीनाथ मुंडे यांचा सर्व धर्म समभावाचे आदर्श घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करावी. नसता लोकसेना संघटना रस्त्यावर उतरुण आंदोलन करणार असा इशारा लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार साहेब यांना जिल्हाधिकारी मार्फ़त निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे मागणी करुन इशारा दिलेला आहे निवेदन देताना प्रा. इलियास इनामदार, अतीख अहमद खान, अयाज़ अख्तर, शेख नदीम मेंबर इत्यादि होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME