२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भटउमरा येथे चित्रकला ,रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भटउमरा येथे चित्रकला ,रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
वाशीम (प्रतिनिधी ) युगनायक न्युज नेटवर्क
भारतरत्न ,भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी 'रमण प्रभाव' ह्याचा शोध 28 फेब्रुवारी1928 मध्ये लावला.ह्या शोधात त्यांनी लाईट जेंव्हा वेगवेगळ्या माध्यमातून भ्रमण करत असते (स्थायु, द्रव,वायू )तेंव्हा तिचा वेग व गुणांमध्ये बदल जाणवून येतो या शोधामुळे भारताच्या प्रगतीला कलाटणी मिळाली . तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्व देशभर साजरा केला जातो.यादिवशी वाशिम पासून नजीक असलेल्या भटउमरा जिल्हा परिषद शाळेत विज्ञानावर आधारीत रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत 4 थी,5 वी,6वी ,7वी तील विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता.विज्ञान विषय शिक्षक श्री.समाधान गि-हे सर यांनी आयोजन केले होते.यास शाळेचे मुख्याध्यापक मोहन कांबळे सर,,तंत्रस्नेही शिक्षक मोहन देवळे सर ,इंगळे मॅडम,धुळे मॅडम,सरनाईक मॅडम यांनी सहकार्य केले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME