दिव्यांगांना न्याय देण्यात यावा -स्वाभिमानी शेतकरी संघटना

दिव्यांगांना न्याय देण्यात यावा -स्वाभिमानी शेतकरी संघटना


बुलढाणा - (युगनायक न्युज नेटवर्क )

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक ०८/०३/२०२२ रोज मंगळवार ला विशेष मोहिम राबविण्यात आली.

सद्या दिनांक ०७/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीमध्ये दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे त्या नुसारच दिनांक ०८/०३/२०२२ ला मेहकर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सदरील नियोजीत ठिकाणी तलाठी यांना उपस्थित राहनेबाबत मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी पत्राद्वारे कळविलेले असतांना सुद्धा या स्थळी कुणीच उपस्थित नव्हते.सोबतच अगोदर दिव्यांग बांधवांना याची कल्पना देन्याचे सांगण्यात आले होते परंतु ते काम सुद्धा पूर्णपणे पार पडलेले दिसले नाही .ज्या दिंव्यांगांपर्यंत याची माहिती पोहोचविल्या गेली त्यामध्ये सुद्धा त्यांना आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले होते परंतु शिबिरस्थळी वेगळीच परिस्थिती पहायला मिळाली.शिबिर स्थळी कुठलेच नियोजन नव्हते,ज्या दिव्यांगांना कल्पना देण्यात आली होती त्यांना सकाळी १० ची वेळ सांगण्यात आली होती आणि शिबिर स्थळी डाॕक्टर दुपारच्या १ वाजेच्या सुमारास यायला सुरुवात झाली ते सुद्धा एक  एक..शिबिरस्थळी रिन्युअल वाल्यांनी परत जावे व यु.डी.आय.डी.कार्ड ईथे मिळनार नाही या प्रकारे अनाउंसमेंट करण्यात येत होती.एक वाजता डाॕक्टर आल्यानंतर काही दिव्यांगांना तपासुन झाल्यावर परत बुलढाणा या असे सांगण्यात येत होते त्यामुळे दिंव्यांगजनात खूप नाराजी बघायला मिळाली.प्रमाणपत्र देणार सांगून बोलावले आणि आता बुलढाणा बोलवत आहात म्हणून दिव्यांगजनात मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळाला.शिबिरस्थळी संगणकाची कुठलीही व्यवस्था नव्हती.जेंव्हा शिबिरस्थळी पत्रकार हजर झाले असता डाॕक्टर व बाकीच्यांनी तेथून पळ काढला व एका बंद खोलीमध्ये आता काय उत्तर देनार अशी चर्चा सुरु होती.दुपारपर्यंत दिव्यांगांना प्यायला पाणी ही उपलब्ध नव्हते.सकाळी सकाळी ११ वाजताच तासाभरात फाॕर्मचा तुटवडा होता.ए.वन.फाॕर्म भरण्याची सुविधाच नव्हती.कुणीच कुणाला पुरेपुर माहिती देऊ शकत नव्हते.दिव्यांगांना ढासाळ नियोजनाचा सामना करावा लागला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुका अध्यक्ष नितिन अग्रवाल यांनी बर्याच अधिकाऱ्यांशी व डाॕक्टरशी संपर्क साधून त्यांचे म्हणने ऐकून घेण्याचा प्रयत्न केला ,फाॕर्म ची संख्या वाढवून उपलब्ध करायला लावले व व्यवस्थित रित्या सर्व नियोजन करुन परत एकदा शिबिर घेण्याचि विनंती केली.सोबतच डाॕक्टर १० चा वेळ देऊन दुपारपर्यंत कुठे गायब होते? प्रमाणपत्र देनार सांगितल्यानंतर का दिल्या जात नाहिये ? आता दिव्यांगांना जो मानसिक,आर्थिक ,शारीरिक त्रास सहन करावा लागला तो कोण भरुन देनार ? असे प्रश्न उभे केले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू