संपुर्ण वर्षभर राबविणार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम
संपुर्ण वर्षभर राबविणार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम
जउळका रेल्वे ( प्रतिनिधी सुरज अवचार )
केंन्र्द सरकारच्या कला व क्रिडा विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक भारत श्रेष्ठ भारत तसेच अमृत महोत्सव स्वांतत्र्याचा हा उपक्रम सर्व शाळा काॅलेज महाविद्यालय यामधुन राबविण्यात येत आहे.
परंतू श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिमचे तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी ह्या शासनकृत स्तुत्य उपक्रमाची सुरूवात दि. १५ आँगस्ट २०२१ ते १५ आँगस्ट २०२२ या संपुर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज न चुकता नाविन्यपुर्ण माहितीने व मनोरंजक पद्धतीने आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या युट्युब चँनलच्या माध्यमातुन विद्यार्थानपर्यंत पोहचवली.
एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत महाराष्ट्र व ओडीसा राज्याबरोबरच भारतातील संपुर्ण घटक राज्यांची माहिती प्रश्नमंजुषेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या वेबसाईटवर केली तसेच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची माहिती सुद्धा प्रश्नमंजुषेच्या उपक्रमातुन विद्यार्थ्यापर्यत पोहचली .
तिस-या सत्रात गाथा बलीदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या ज्ञात अज्ञान शुरविरांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातुन ओळख करुन दिली.
चौथ्या सत्रात लोकशाहीचे आधारस्तंभ, कायदेमंडळ, कार्यकाळी मंडळ ,न्यायमंडळ, स्वायत्त संस्था , समाज माध्यमे ,पत्रकारीता यांची ओळख
पाचव्या सत्रात बेटी बचाव बेटी पढाव , पढेगा भारत तो ही बढेगा भारत तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा, जसे युट्युब चँनल ,वेबसाईट निर्मीती इत्यादी संपुर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्व ज्ञानचक्षुंनी या उपक्रमात सहभागी होउन स्वातंत्र्याचा यज्ञकुंडातील स्वातंत्र्य विरांची ओळख करून आपले योगदान द्यावे असे आव्हान ज्ञानयात्री तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी केले .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME