धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीर लक्ष्मीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे संपन्न
धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीर लक्ष्मीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे संपन्न
बीड. (प्रतिनिधी )युगनायक न्युज नेटवर्क भारतीय सत्यशोधक महासंघ आणि बौद्धमय भारत निर्माण अभियान अंतर्गत धम्मप्रचार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि २०फेब्रुवारी रोजी दुपारी २:००वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह बीड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील धर्मपरिवर्तन केलेल्या नवदीक्षिताना धम्म कळावा व प्रत्येकाने धम्माचे अनुसरन करून इतरांना दीक्षित होण्यासाठी मार्गदर्शन करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन अमरसिंह ठाका (महाराष्ट्र संघटक सत्यशोधक ओबीसी परिषद )यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मप्रचारक लक्ष्मीकांतशिंदे अध्यक्ष भारतीय सत्यशोधक महासंघ हे होते तर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विष्णु कांबळे बीड जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पांडुरंग साळवी सामाजिक कार्यकर्ते, अरुण कांबळे कार्यकारी संपादक तथागत मासिक, रेखाताई दाभाडे नांदेड होते कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून गोपीनाथ कांबळे, ऍड. आनंद दुधकवडे, राजेश डोंगरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. एस. आर. बोधडे, ऍड. चंद्रवण जाधव, गोरक्षनाथ शेलार, आनंद कांबळे, धर्मराज मुजमुळे, रंगनाथ भालेराव जिजा प्रव्हाने आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME