"एक भारत श्रेष्ठ भारत" उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा व वत्कृत्व स्पर्धा उपक्रम श्री शिवाजी डि.एड.काँलेज मध्ये संपन्न. "
"एक भारत श्रेष्ठ भारत" उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा व वत्कृत्व स्पर्धा उपक्रम श्री शिवाजी डि.एड.काँलेज मध्ये संपन्न.
जउळका रेल्वे ( प्रतीनिधी सुरज अवचार )युगनायक न्युज नेटवर्क
केंन्द्रसरकारच्या कला व क्रिडा विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक भारत श्रेष्ठ भारत तसेच अमृत महोत्सव स्वांतंत्र्याचा हा उपक्रम सर्व शाळा काॅलेज, महाविद्यालय मध्ये राबविण्यात येत आहे. श्री शिवाजी डि.एड. काॅलेज वाशिम येथे एक भारत श्रेष्ठ भारत याअंतर्गत दि.२४/०१/ २०२२ रोजी प्रश्नमंजुषा उपक्रम व वत्कृत्व स्पर्धा दि.२८ /०१ / २०२२ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा.सौ. अनिताताई सरनाईक यांनी या कार्यक्रमांचे उद्घाटन करुन दिपप्रज्वलन कले.
वत्कृत्व स्पर्धेमध्ये अनेक छात्रध्यापकांनी सहभाग घेउन महाराष्ट्र व ओडीसा राज्यांची संस्कृती व परंपरा या विषयावर आपले विचार व्यक्त केले . प्रास्ताविक काॅलेजच्या प्रशासकीय अधीकारी सौ.भारती देशमुख यांनी केले . या प्रसंगी मा.सौ.अनिताताई सरनाईक नी इपले विचार व्यक्त करतांना त्या म्हणाल्या अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केल्यास विद्यार्थांचे ज्ञान वृध्दिंगत होउन विचाराची देवाण घेवाण होउन विद्यार्थी प्रगलम होतात व देशभक्तीची जाणीव त्याच्यांत निर्माण होते.
शेवटी प्रश्नमंजुषा उपक्रम व वकृत्व उपक्रमातील प्रथम ,व्दितीय ,तृतीय क्रमांकाच्या छात्रध्यापकांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र मा.सौ.सरनाईक मॅडमच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
याप्रसंगी प्राचार्य रोकडे सर , खुडसडे मॅडम , बेदरकर मॅडम, पाटील मॅडम, जाधव , मुंधरे मॅडम व सोळंके सर उपस्थित होते. प्रश्नमंजुषा उपक्रमांचे मार्गदर्शक म्हणून प्रा, बेदरकर मॅडम तसेच वकृत्व स्पर्धेच्या मार्गदर्शक म्हणून खुडसुडे मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME