डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करून संबंधितवार कार्यवाही करण्याची मागणी


डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करून  संबंधितवार  कार्यवाही करण्याची  मागणी 




बुलढाणा (प्रतिनिधी ) युगानायक न्युज नेटवर्क 

डोड्रा ते देऊळगाव मही डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे गुणनियंत्रण पथकाकडून चौकशी करा अन्यथा तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी 1/2/2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बुलढाणा यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की डोड्रा तालुका देऊळगाव राजा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना डांबरीकरण व गावातून सिमेंट रस्ता झाला आहे हे काम मुदतीपूर्वीच खराब झाला असून गावातील सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून रस्त्यावर गावातील शाळेजवळ मोठमोठाली खड्डे पडले आहे मुख्य सांडपाण्याची विल्हेवाट लावलेले नसून दोन्ही साईट च्या नाल्याचे काम अपूर्ण आहे त्या सांडपाण्याच्या नाल्याची विल्हेवाट लावावी त्या ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता आहे या संपूर्ण प्रकाराची तपासणी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी जिल्हाधिकारी भेटी प्रसंगी च्या निवेदनात दिला आहे

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू