Posts

मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मातंग समाजातील कांबळे कुटुंबाला भेट

Image
मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची  मातंग समाजातील कांबळे कुटुंबाला भेट  जालना.- (युगनायक न्युज नेटवर्क ) मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मौजे देठणा, ता अंबड ,जिल्हा जालना मधील मातंग समाजातील कांबळे कुंटुबातील लोकांवर जो गावगुंड जातीवादी योगेश धांडे व सहकुटुंब परिवार व अन्य आरोपी यांनी जो हल्ला केला या घटने संदर्भात पीडित कुंटुबाना भेट देऊन मा जालना जिल्हा अधिकारी यांना तक्रारी निवेदन सादर करण्यात आले व मा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या सोबत घडलेल्या घटने विषयी चर्चा करून या घटनेच गांभीर्य लक्षात आणून दिले व संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की आरोपींना तात्काळ अटक करून तडीपारी करावी व हा खटला अंडरट्रायल चालवावा असे मा जालना जिल्हा अधिकारी साहेब यांना समक्ष भेटुन चर्चा करण्यात आली तसेच मा जिल्हा अधिकारी साहेब यांनी शब्द दिला की मी sp साहेब यांना तात्काळ कळवतो आणि लवकरात लवकर या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी असे मी सांगतो त्यावेळी निवेदन देताना उपस्थित मा भैय्यासाहेब गवळी मातंग पँथर सेना संस्थाप...

भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठकबैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन

Image
भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठक बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन  वाशिम :(युगनायक न्युज नेटवर्क ) भूमिपुत्र शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 19 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता भूमिपुत्र मध्यवर्ती कार्यालय अकोला नाक, शिवनेरी बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आली आहे.        1 जानेवारीला  भूमिपुत्र चा वर्धापन दिना आसतो. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेची छपाई संदर्भात चर्चा करणे. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र  देणे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज पुरवठ्या संदर्भात जनजागृती व अंदोलनाची दिशा ठरविणे, महाराष्ट्रातुन पीक विमा योजना हद्दपार करणे किंवा धोरणात्मक बदल करणे संदर्भात कार्यवाही करणे इत्यादीं बाबींवर बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीला संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचसह जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, डाॅ.जितेंद्र गवळी,  देव इंगोले, संतोष सुर्वे, सचिन काकडे, श्रीरंग नागरे, भुषण मुराळे, विनोद घुगे हे उपस्थित रा...

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध.

Image
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध. रिसोड - तौसीफ शेख(प्रतिनिधी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांना मंत्री पदावरून हाटवण्यात यावे, या मागणीसाठी वाशीम जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी  चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळ मधून बरखास्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व वंचित बहुजन आघाडी वाशिम च्या वतीने करण्यात आली. त्या नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मा जिल्हाधिकारी वाशिम यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर...

दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित....

Image
दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित.... अमित जाधव - प्रतिनिधी  दिव्यात गणेश नगर येथे बाळासाहेबांची शिवसेना आयोजित मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने  गणेश पाडा येथे पंतप्रधान पाठविक्रेता आत्मनिर्भर निधी शिबीर नागरिकानसाठी आयोजित करण्यात आले होते   पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला होता. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करता यावा यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेकडून रु.10 हजार रक्कमेचे खेळते भांडवली कर्ज देण्यात येत आहे. यामध्ये पथविक्रेत्यांनी प्रथम टप्प्यात रु.10 हजार कर्ज रक्कमेची नियमित परतफेड केल्यास व्दितीय टप्प्यात रु.20 हजार भांडवली कर्ज देण्यात येते आणि रु 20 हजार कर्जाची नियमित परतफेड केल्यास तृतीय टप्प्यात रु....

दिव्यात आर पी एफ महिला पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात केलं दाखल...

Image
दिव्यात आर पी एफ महिला पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात केलं दाखल... अमित जाधव - प्रतिनिधी  दिवा स्टेशन परिसरात गरोदर म्हीललेला प्रचंड त्रास होत असल्याची माहिती आरपीएफ दिवा पोलिसांना मिळताच बीटवर तैनात LSIPF पिंकी यादव आणि LCT ममता JAT यांनी LCT अश्विनी, LCT रुशाली आणि ड्युटी पॉइंट्स सोबत त्या गरोदर असलेल्या महिलेला जवळच्या रुग्णालयात हजर केले. महिलेसोबत आणखी एक महिला तेथे उपस्थित होती, प्रसूती वेदना होत असल्याने महिला प्लॅटफॉर्म पीएफ क्रमांकावर पोहोचली. एक व दोन वरून व्हील चेअरवर बसून हॉस्पिटलसाठी घेऊन गेल्या गेटच्या पूर्वेकडील बूम उघडल्यानंतर लगेचच हॉस्पिटलकडे निघाल्यावर महिलेला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि प्रसूती होण्याची शक्यता असल्यास, सर्व कर्मचाऱ्यांसोबत महिलाही होत्या.महिलांच्या विनयशीलतेची काळजी घेत ऑटो चारी बाजूंनी झाकून ठेवली होती. त्यानंतर लगेचच महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. दरम्यान, महिला व बालकाला मुंब्रादेवी हॉस्पिटल दिवा येथे नेण्यात आले. जिथे महिला आणि बालक दोघांचीही डॉक्टरांनी तपासणी केली असता, दोघेही प्रकृतीत निरोगी असल्य...

ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू..... लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार

Image
ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू..... लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार अमित जाधव - प्रतिनिधी  दिवा (प्रतिनिधी) दातिवली परिसरातील दिवा-आगासन रोड ते म्हसोबा नगर, आगासन रोड -रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक पुढे डोंबिवली मानपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम लवकरच होणार असून सबंधित रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी याबाबत सहमती दर्शविली आहे.याबाबत तिनही ठिकाणी ठाण्याचे माजी उपमहापौर आणि मा.नगरसेवक श्री रमाकांत मढवी यांनी रविवारी भेट देवून पाहणी केली आहे.शेतकऱ्यांनी सहमती दर्शविलेल्या या रस्त्यांमुळे येथील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दातिवली परिसरातील बेडेकरनगर येथील दिवा आगासन रोड ते म्हसोबा नगर या ठिकाणी कच्चा रस्ता आहे.येथील रस्त्यावर गटाराचे साम्राज्य असल्याने लोकांना येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.पावसाळ्यात या ठिकाणी तलावसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिक हैराण होत आहेत.या रस्त्याचे काम व्हावे अशी येथील नागरिकांची मा...

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न.

Image
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न. वाशिम: (युगनायक न्युज नेटवर्क)वाशिम येथील केमिस्ट भवन लाखाळा  येथे डॉ गजानन हुले जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली  आणि मा. अरुंधतीताई सिरसाट वाशिम जिल्हा प्रभारी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक महिला आघाडी किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ ज्योतीताई इंगळे, महासचिव सौ सुशीलताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल गरकल, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, समाधान भगत, डॉ रवी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.        आढावा बैठकी मध्ये वाशिम जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली घेण्यात याव्या असे आदेश मा श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे अस्या सूचना मा अरुंधतीताई सिर...

सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!!

Image
सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!! सध्या वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जवळ आली, की इच्छूक उमेदवार आश्वासने देत सुटतात. दुसरीकडे आपल्या काळात किती विकासकामे केली, याची आकडेवारी सत्ताधारी मतदारांसमोर सादर करतात. त्यातून नेमकं कोणाचं खरं, हे समजत नसल्याने मतदारांचाही गोंधळ उडतो. सरपंचांनी कोणता निधी कुठे आणि कशावर खर्च केला, गावातील ज्या कामासाठी निधी खर्च केला, त्याची खरंच गरज होती का, त्यातून सरपंच व सदस्यांनी केलेल्या विकासकामांवर शंका उपस्थित होते. मात्र, आता तुम्हाला ही सारी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीने खरंच किती विकास केला, हे जाणून घेता येणार आहे.. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी खरंच काम केलंय की नाही, याचा माहिती घरबसल्या जाणून घेता येते. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेऊ या… अशी जाणून घ्या माहिती.. – सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच पुढील वेबसाईटवरूनही माहिती घेऊ शकता – https://egramswaraj.gov.in/financialP...

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त*जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा* चे आयोजन

Image
राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त * जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा * चे आयोजन (ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शैक्षणिक उपक्रम) स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत  दि.२८ नोव्हेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान *जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा*आयोजित करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त *जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा* आयोजित करण्यात आली असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची माहिती व्हावी,शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धापरीक्षेविषयी जागृती व्हावी,विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावी,विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार काळावेत, महापुरुषांच्या विचारांवर समाजा...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Image
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवा मुंबई, (युगनायक न्युज नेटवर्क )दि. 29 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी  https:// admissions.tiss.edu  या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर, जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आध...

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी

Image
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी  बुलढाणा (प्रतिनिधी) : राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड तसेच पश्चिम बंगाल राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा भविष्य उज्ज्वल केला आहे. याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करावी.या  एकमेव संविधानीक मागणी साठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत दिनांक २१/०९/२०२२ रोजी जुनी पेन्शन संदेश बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरु करण्याची मागणीसाठी आयोजित बॉईक रॅली  ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचा जाहीर पाठींबा आहे.म्हणुन जिल्हाभरातील हजारो जुनी पेन्शन हक्क सेनेचे पेन्शन सैनिक, शिक्षक सेनेचे शिक्षक सैनिक यांनी ही रैली अभूतपूर्वरित्या यशस्वी करण्यासाठी व शासनाला आपल्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी उद्या दिनांक २१/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आपण सर्वांनी  जिजामाता प्रेक्षकगार बुलढाणा येथे एकत्रित व्हायचं आहे. ही भव्यदिव्...

गोगलगायी मुळे कुंबेफळ येथील शेतकरी त्रस्त शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी....

Image
  गोगलगायी मुळे कुंबेफळ येथील शेतकरी त्रस्त शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी.... लोणार /लुकमान कुरेशी लोणार तालुक्यातील बिबी या गावाजवळील कुंबेफळ शिवारातील शेतीमध्ये गोगलगाय या सरपटणारे किड ने सोयाबीन,कपाशी व इतर पिकाची नुकसान होत आहे.त्यामुळे सदरील पिकाची शासनाकडून पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी याकरिता गावातील शेतकरयांनी सिंदखेडराजा येथे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत त्याची प्रतिलिपी तहसीलदार,उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.कुंबेफळ या गावातील शेतशिवारामध्ये गोगलगाय या पासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासन दरबारी नुकसान भरपाईची अपेक्षा ठेवुन आहे.  कुंबेफळ शिवारातील गट क्रमांक68,107,106,108,104,121,122,109,111या क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन पीक गोगलगायीने पूर्ण उध्वस्त केले आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर माधवराव फड, रामराव फड,त्र्यंबक फड प्रशांत फड,साहेबराव फड, गणेश फड व इतर शेतकऱ्यांच्या सह्या असलेली निवेदन देण्यात आले आहे.

तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथील ,अतिशय निंदनीय हे घटनेचा जाहीर निषेध दलितांवरील अन्याय खपून घेतल्या जाणार नाही - सम्राट अशोक सेना

Image
तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथील ,अतिशय निंदनीय हे घटनेचा  जाहीर निषेध दलितांवरील अन्याय खपून घेतल्या जाणार नाही - सम्राट अशोक सेना अकोला . (युगनायक न्युज नेटवर्क ) दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी, महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे,अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे,सम्राट अशोक सेनेच्या वतीने आंदोलन व मोर्चा काढण्यात आला आहे,बुलढाणा जिल्ह्यातील,तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथे,अतिशय निंदनीय हे घटना महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली,महाराचा बैल तोरणाखाली नको म्हणत बौध्द वृध्द महिलांना,विरुद्ध पुरुषांना जातीयवादी गावगुंडांनी केली जबर मारहाण! बुलढाणा,तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येते काल पोळा सणानिमित्त सर्व गावकरी पोळा साजरा करत होते,तोरणाखाली महाराचा बैल नको म्हणत काही जातीयवादी गावगुंडांनी विरोध केला,जातीयवादी शिवीगाळ करत काठ्याने मारहाण करण्यात आली,व्हिडिओ मधील लाल शर्ट आणि पांढरा शर्ट काळी पँट असे दोघे तिघे दिसत आहेत,अनुसूचित जातीच्या वृद्ध,  महिलांना मारलेले दिसत आहे,उघड उघड यात बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केलेला आहे,  जानेफळ पोल...

रक्ताविषयी काही मजेशीर माहिती

Image
  रक्ताविषयी काही मजेशीर माहिती रक्ताविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी नक्की वाचा जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती. आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते आणि उरलेले १ टक्का रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्समध्ये असते. १ मिली रक्तामध्ये १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात. आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदामध्ये १२००० किमी अंतर पार करू शकतात. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटरपर्यंत उडू शकते. मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते. नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास ५ ल...

परिवर्तन सभेचे आयोजन

Image
  परिवर्तन सभेचे आयोजन रिसोड (युगनायक न्यूज नेटवर्क ) दि. 7/82022 रिसोड विश्रामगृह रिसोड येथे मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने वाशीम जिल्हाअध्यक्ष श्री प्रल्हादजी लगड  यांच्या अध्यक्ष मध्ये परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम स्व वसंतरावजी जोगदंड सर यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरवात झाली या सभेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जयंती पूर्ण ऑगस्ट महिना भर साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने वाशीम जिल्ह्यामद्ये  जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज बांधवानी जयंती साजरी करण्यासाठी एकत्र यावे तसेच मानवहीत लोकशाही पक्ष वाढवण्यासाठी एकत्र यावे या कार्यक्रमासाठी बबनराव इंगळे, महीपत इंगळे,बाळासाहेब जोगदंड,साबळे सर,संतोषजी इंगळे शुभम लोखंडे,संदीप झेंडे,देवानंद खडसे,विजय पिसुळे ज्ञानेश्वर इंगळे आत्मराम अंभोरे, नितीन कांबळे, प्रमोद जोगदंड,साहिल साठे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते

बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे

Image
  बहुरंगी साहित्य निर्मिती चे जनक  अण्णा भाऊच -सुरेश जयाजी अंभोरे रिठद येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी रिसोड .  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  बहु.कला, क्रीडा व शिक्षण संस्था,रिठद च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन ऍड. भारत  गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराव गवळी प्रमुख पाहुणे म्हणून सोपान अंभोरे, आणि सुरेश जयाजी अंभोरे होते यावेळी संस्थेचे  उपाध्यक्ष दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती च्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी दत्तराव गवळी यांनी अण्णा भाऊ साठे याच्या साहित्याचा  प्रचार प्रसार हा जन सामान्य पर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा  कारण आज मराठी माणूस हा भ्रमणध्वनी चा वापर प्रमाणापेक्षा ज्यास्त करत असुन साहित्यापासून दुरावत जात आहे त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीने साहित्यिक व त्यांचे साहित्य जपणे ही काळाची गरज आहे. असे विचार अध्यक्षीय भाषणात विचार मांडले. क...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना रिठद येथे विनम्र अभिवादन...!

Image
  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  यांना रिठद येथे विनम्र अभिवादन...! लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे बहु. कला, क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद  रिसोड /रिठद (युगनायक न्यूज नेटवर्क ) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  बहु. कला क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद  च्या वतीने अण्णा भाऊ साठे  यांना अभिवादन करण्यात आले.   कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  बहु. कला क्रीडा व शिक्षण संस्था, रिठद च्या वतीने कार्यालयात आयोजन करण्यात आले हॊते.  कार्यक्रच्या अध्यक्षस्थानी  ऍड. भारत गवळीकर  तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तराव गवळी,सुरेश अंभोरे, परसराम कांबळे, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी ऍड. भारत गवळीकर  यांनी अण्णा भाऊ साठे  यांना अभिवादन करतांना अण्णा साठे यांनी सांगितलेल्या प्रमाणे.......... "जग बदल घालुनी घाव  मज सांगून गेले भीमराव " यांचा मतितार्थ  जो पर्यतं मातंग समाज  समजुन घेणार नाही तो पर्यंत समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय विकास होणे शक्य नाही कारण  आज महाराष्ट्रातील मातंग समाजातील  आर्थिक विकास...

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार

Image
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार मुंबई , (युगनायक न्यूज नेटवर्क ) दि. 6 : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर रोजगार वाढीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वाढीसाठी प्रोत्साहन देणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्यॉरशिप (Global Alliance for Mass Entrepreneurship -GAME) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येतील. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन्द्र सिंह कुशवाह, GAME चे संस्थापक रवी व्यंकटेशन (दूरदृश्यप्रणालीद्वारे), कौशल्य विकासच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव डॉ. नामदेव भोसले, गेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश  गोंडप्पा, उपाध्यक्ष संजना गोविंदन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील महिला उद्योजकतेची स्थिती आणि महिलां...

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी शंकर रोहि सर यांची निवड

Image
  श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी शंकर रोहि सर यांची निवड l रिसोड .- (युगनायक न्यूज नेटवर्क )  परिसरातील धार्मिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या आणि महंत श्री शांतीपूरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवता नगरीचे रहिवासी असलेले श्री शंकर रोही सर यांची आज श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येवता च्या मुख्याध्यापक पदी निवड झाली श्री शंकर रोही सर यांना सुरुवातीपासूनच शिक्षणाची आणि मुलांना शिकवण्याची आवड होती, रोही सर यांचे शिक्षण BA BPED पर्यंत झालेले असून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याची सुरुवात, एक शिक्षक म्हणून 1 नोव्हेंबर 2001 पासून सुरुवात केली श्री शिवाजी विद्यालय च्या सुरुवातीपासून त्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं मोलाचे योगदान दिलं आहे. सुरुवातीला श्री शिवाजी विद्यालय नेतन्सा येथे होते परंतु शांतिपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी तेथून श्री शिवाजी विद्यालय येवता येथे आणले तेव्हापासूनच श्री रोहि सर यांनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घातला ....

कॅन्सल झालेलं Ration Card कसं कराल अ‍ॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस

Image
  रद्द   झालेलं Ration Card कसं कराल अ‍ॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस रेशन कार्डधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर (Ration Card) स्वस्त दरातील धान्य घेत नसाल, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. यापूर्वीच जर तुमचंही रेशन कार्ड रद्द झालं असेल तर ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करता येईल. जाणून घ्या Ration Card पुन्हा ऍक्टिव्ह करण्याची सोपी पद्धत :- – सर्वात आधी राज्य किंवा सेंट्रल AePDS पोर्टलवर जा. – आता Ration Card Correction पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. – Ration Card Correction पेज वर तुमचा रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. – आता तुमच्या रेशन कार्डमध्ये काही चूका असल्यास त्या दुरुस्त करता येतील. – त्यानंतर PDS अर्थात Public Distribution Systemकार्यालयात अर्ज सबमिट करावा लागेल. – तुमचं रेशन कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी अर्ज स्वीकारल्यास त्यानंतर रद्द झालेलं रेशन कार्ड सक्रीय अर्थात अ‍ॅक्टिव्ह होईल. नियमानुसार, जर एखाद्या रेशनकार्ड होल्डरने मागील सहा महिन्यांपासून रेशन कार्डवर धान्य घेतलेलं नसेल, तर त्याला स्वस्तात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही किंवा तो व्यक्...