मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मातंग समाजातील कांबळे कुटुंबाला भेट
जालना.- (युगनायक न्युज नेटवर्क )मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मौजे देठणा, ता अंबड ,जिल्हा जालना मधील मातंग समाजातील कांबळे कुंटुबातील लोकांवर जो गावगुंड जातीवादी योगेश धांडे व सहकुटुंब परिवार व अन्य आरोपी यांनी जो हल्ला केला या घटने संदर्भात पीडित कुंटुबाना भेट देऊन मा जालना जिल्हा अधिकारी यांना तक्रारी निवेदन सादर करण्यात आले व मा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या सोबत घडलेल्या घटने विषयी चर्चा करून या घटनेच गांभीर्य लक्षात आणून दिले व संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की आरोपींना तात्काळ अटक करून तडीपारी करावी व हा खटला अंडरट्रायल चालवावा असे मा जालना जिल्हा अधिकारी साहेब यांना समक्ष भेटुन चर्चा करण्यात आली तसेच मा जिल्हा अधिकारी साहेब यांनी शब्द दिला की मी sp साहेब यांना तात्काळ कळवतो आणि लवकरात लवकर या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी असे मी सांगतो त्यावेळी निवेदन देताना उपस्थित मा भैय्यासाहेब गवळी मातंग पँथर सेना संस्थापक अध्यक्ष, मा.अविनाश भाऊ मिसाळ युवा नेते , अनिल अंभोरे बदनापूर तालुका अध्यक्ष,शैलेंद्र अंभोरे ,जालिंदर अंभोरे , राहुल अंभोरे व समस्त बदनापूर जालना येथील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME