भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठकबैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन
भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठक
बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन
वाशिम :(युगनायक न्युज नेटवर्क )
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 19 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता भूमिपुत्र मध्यवर्ती कार्यालय अकोला नाक, शिवनेरी बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आली आहे.
1 जानेवारीला भूमिपुत्र चा वर्धापन दिना आसतो. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेची छपाई संदर्भात चर्चा करणे. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज पुरवठ्या संदर्भात जनजागृती व अंदोलनाची दिशा ठरविणे, महाराष्ट्रातुन पीक विमा योजना हद्दपार करणे किंवा धोरणात्मक बदल करणे संदर्भात कार्यवाही करणे इत्यादीं बाबींवर बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीला संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचसह जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, डाॅ.जितेंद्र गवळी, देव इंगोले, संतोष सुर्वे, सचिन काकडे, श्रीरंग नागरे, भुषण मुराळे, विनोद घुगे हे उपस्थित राहणार आहेत. आपणही वेळेवर यावे अशी विनंती.....आणि आवाहन
उत्तमराव आरू
जिल्हाकार्यध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना
वाशिम जिल्हा..यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME