वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न.

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न.


वाशिम: (युगनायक न्युज नेटवर्क)वाशिम येथील केमिस्ट भवन लाखाळा  येथे डॉ गजानन हुले जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली  आणि मा. अरुंधतीताई सिरसाट वाशिम जिल्हा प्रभारी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक महिला आघाडी किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ ज्योतीताई इंगळे, महासचिव सौ सुशीलताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल गरकल, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, समाधान भगत, डॉ रवी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      आढावा बैठकी मध्ये वाशिम जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली घेण्यात याव्या असे आदेश मा श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे अस्या सूचना मा अरुंधतीताई सिरसाट यांनी दिल्या. वाशिम जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून निवडणुका लढवून आपली ताकद कायम ठेवावी असे संबोधन केले. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उमेदवार यांच्या बद्दल माहिती घेऊन कार्यकर्त्यांच्या समस्या , अडचणी, तक्रारी, ऐकून त्यावर मार्ग कसा काढायचा यावर योग्य प्रकारे निरसन करून पुढील काळात एकीच्या ताकतीने ग्रामपंचायत सह प्रत्येक निवडणुकीला सामोरे जायचं ह्या सूचना वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना मा. अरुंधतीताई सिरसाट यांनी दिल्या. तसेच वाशिम जिल्ह्याचा व  वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपिर, कारंजा, मानोरा या सहाही तालुक्यातील तालुका अध्यक्ष / महासचिव यांच्याकडून आढावा घेऊन महत्वाच्या सूचना दिल्या. आढावा बैठकीमध्ये अखिल भारतीय माळी महासंघाच्या मा रेखाताई राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये वरील मान्यवरांच्या हस्ते मा किरणताई गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश घेतला. बैठकीचे सूत्रसंचालन वाशिम तालुका महासचिव संजय पडघन यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे यांनी केले. यावेळी सौ किरणताई गिर्हे, सिद्धार्थ देवळे, डॉ गजानन हुले, सोनाजी इंगळे, सय्यद अकिलभाई, ऍड. हिरामण मोरे, संदीप सावळे, रवींद्र देशमुख, यांनी आपले विचार व्यक्त केले. आढावा बैठकीला जिल्हा   सचिव वसंतराव हिवराळे, उत्तमराव झगडे, विनोद भगत, दिलीप भगत, गजानन माळेकर, जिल्हा मार्गदर्शक भास्करराव गायकवाड, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब खंडारे, विधी सल्लागार ऍड हिरामण मोरे, जिल्हा महासचिव महिला आघाडी सौ प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी उपाध्यक्ष गजानन बाजड, तालुका अध्यक्ष विनोद राठोड, सारनाथ अवचार, नारायणराव खोडके, ता महासचिव संजय पडघन, महेश तिडके, राजु तायडे, नंदू वानखेडे, मा.रिसोड शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे, जिल्ह्यातील महिला आघाडीच्या  राहुल किरण खडसे जिल्हा सचिव, वंचित रुपाली भगत सहसचिव, सषमा भगत सदस्य, शोभा इंगोले सदस्य, आशा खडसे तालुका अध्यक्ष, विमलताई सावळे वाशिम तालुका अध्यक्ष, त्रिशीलाबाई जाधव जिल्हा सचिव, रेखाताई राऊत तालुका सचिव, जयश्री सचिन कांबळे, अर्जुन डोंगरदिवे,  गजानन गव्हांदे, संतोष सरकटे, सचिन कंबळे, गोपाळ मनवर, गजानन इंगोले, भाऊराव सावळे, इस्माईल नोरंगाबादी, अरुण बोरकर, केशव अंभोरे, शिवशंकर मोळकर, प्रताप मोरे यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू