तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथील ,अतिशय निंदनीय हे घटनेचा जाहीर निषेध दलितांवरील अन्याय खपून घेतल्या जाणार नाही - सम्राट अशोक सेना
तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथील ,अतिशय निंदनीय हे घटनेचा जाहीर निषेध दलितांवरील अन्याय खपून घेतल्या जाणार नाही - सम्राट अशोक सेना
अकोला. (युगनायक न्युज नेटवर्क ) दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी, महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे,अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे,सम्राट अशोक सेनेच्या वतीने आंदोलन व मोर्चा काढण्यात आला आहे,बुलढाणा जिल्ह्यातील,तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथे,अतिशय निंदनीय हे घटना महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली,महाराचा बैल तोरणाखाली नको म्हणत बौध्द वृध्द महिलांना,विरुद्ध पुरुषांना जातीयवादी गावगुंडांनी केली जबर मारहाण!
बुलढाणा,तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येते काल पोळा सणानिमित्त सर्व गावकरी पोळा साजरा करत होते,तोरणाखाली महाराचा बैल नको म्हणत काही जातीयवादी गावगुंडांनी विरोध केला,जातीयवादी शिवीगाळ करत काठ्याने मारहाण करण्यात आली,व्हिडिओ मधील लाल शर्ट आणि पांढरा शर्ट काळी पँट असे दोघे तिघे दिसत आहेत,अनुसूचित जातीच्या वृद्ध,
महिलांना मारलेले दिसत आहे,उघड उघड यात बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केलेला आहे,
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे,बड्या जातीयवादी लोकप्रतिनिधीचे हे कार्यकर्ते आहेत. त्यांना जातीची,सत्तेची मस्ती चडलेली आहे,आमच्या आया बहिणींना खाली पाडून मारहाण केली जात आहे. सम्राट अशोक सेना निषेध करत असून पोलीस अधीक्षकाने तात्काळ या जातीयवादी गावगुंडांना अटक करावी. त्यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट,अंतर्गत, दंगली घडून,307,354 विनयभंग अंतर्गत कार्यवाही करावी.पीडितांना बौध्द वस्तीला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे सर्व गावातील भीतीच वातावरण पसरलेला आहे,बौद्ध वस्तीला तात्काळ संरक्षण देऊन सर्व घडलेल्या प्रकारातील आरोपांना तात्काळ अटक करावे अन्यथा याच्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन सम्राट अशोक सेनेच्या वतीने छेडण्यात येणार आहे हेच आम्ही इशारा देतो, आंदोलनामध्ये उपस्थित सर्व कार्यकर्ते व भीमसैनिक उपस्थित होते, रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांनी आपल्या माय बहिणीला न्याय देण्यासाठी उपस्थित राहिलाच पाहिजेत हेच आम्ही आवाहन करतो.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME