ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू..... लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार
ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू.....
लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार
अमित जाधव - प्रतिनिधी
दिवा (प्रतिनिधी) दातिवली परिसरातील दिवा-आगासन रोड ते म्हसोबा नगर, आगासन रोड -रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक पुढे डोंबिवली मानपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम लवकरच होणार असून सबंधित रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी याबाबत सहमती दर्शविली आहे.याबाबत तिनही ठिकाणी ठाण्याचे माजी उपमहापौर आणि मा.नगरसेवक श्री रमाकांत मढवी यांनी रविवारी भेट देवून पाहणी केली आहे.शेतकऱ्यांनी सहमती दर्शविलेल्या या रस्त्यांमुळे येथील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दातिवली परिसरातील बेडेकरनगर येथील दिवा आगासन रोड ते म्हसोबा नगर या ठिकाणी कच्चा रस्ता आहे.येथील रस्त्यावर गटाराचे साम्राज्य असल्याने लोकांना येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.पावसाळ्यात या ठिकाणी तलावसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिक हैराण होत आहेत.या रस्त्याचे काम व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.परंतु येथील या रस्त्यात शेतकऱ्यांची जागा जाण्याची शक्यता असल्याने रस्त्याच्या कामास विलंब होत आहे.मात्र आज ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी आणि त्यांच्या सहकऱ्यांनी घडवून आणलेल्या चर्चेअंती येथील शेतऱ्यांनीही रस्त्यासाठी सहमती दर्शविली आहे.त्यामुळे आता येथील नागरिकांना गटारातून करावा लागणारा प्रवास वाचणार आहे.200 मी.लांबीचा रस्ता लवकरच बनविला जाणार आहे.
दिवा आगासन रोड ते रविना बिल्डींग येथे रस्ताच अस्तित्वात नसल्याने नागरिकांना येजा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नुसती पायवाट असल्याने नागरिकांना पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यातही प्रवास करताना मोठा त्रास होतो.येथील रस्ता होण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण होती.दरम्यान श्री रमाकांत मढवी यांनी शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेअंती येथील रस्त्याच्या कामासाठीची समस्या दूर होत आहे.येथील रस्ताही 200 मीटर लांबीचा बांधण्यात येणार आहे. तदनंतर दातिवली ते म्हातार्डी चौक येथील अरुंद रस्त्याची पाहणी करण्यात आली. येथील रस्ता दिवा आणि डोंबिवली मानपाड्याला जोडणारा असून स्थानिक नागरिक,कामगार तसेच दळणवळणासाठी महत्वाचा मानला जात आहे.येणाऱ्या जाणाऱ्या दोन मोठ्या गाड्या पास न होणे ही येथील सर्वात मोठी समस्या आहे.येथील रस्ता आखूड असल्यामुळे नियमित मोठे अपघात घडत असतात.त्यामुळे या रस्त्यालाही येथील शेतकऱ्यांनी झालेल्या चर्चेअंती ग्रीन सिग्नल दिला आहे.हा रस्ता लवकरच 25 फुट रुंदीचा करण्यात येणार असल्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांनी सांगितले.
या रस्त्यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी, शिवसेना उपशहर प्रमुख श्री चरणदास म्हात्रे,श्री रविंद्र म्हात्रे,श्री अरुण म्हात्रे,श्री शिवदास पाटील,श्री राजेश पाटील,श्री अनिल नाईक,श्री विलास म्हात्रे,श्री जयदास शेलार,श्री कैलास मढवी,श्री विनोद मढवी,श्री रणदिप मढवी,श्री दत्ता बेडेकर,श्री राकेश म्हात्रे,श्री कुणाल म्हात्रे,श्री भुषण घरत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME