दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित....
दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित....
अमित जाधव - प्रतिनिधी
दिव्यात गणेश नगर येथे बाळासाहेबांची शिवसेना आयोजित मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने गणेश पाडा येथे पंतप्रधान पाठविक्रेता आत्मनिर्भर निधी शिबीर नागरिकानसाठी आयोजित करण्यात आले होते
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला होता. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करता यावा यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेकडून रु.10 हजार रक्कमेचे खेळते भांडवली कर्ज देण्यात येत आहे.
यामध्ये पथविक्रेत्यांनी प्रथम टप्प्यात रु.10 हजार कर्ज रक्कमेची नियमित परतफेड केल्यास व्दितीय टप्प्यात रु.20 हजार भांडवली कर्ज देण्यात येते आणि रु 20 हजार कर्जाची नियमित परतफेड केल्यास तृतीय टप्प्यात रु.50 हजार इतके कर्ज देण्यात येते. अशाप्रकारे पथविक्रेत्याची बॅकेमध्ये पत वाढल्यास त्यास बँकेव्दारे अधिक पतपुरवठा करण्यात येतो. त्या सोबतच केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या भविष्य निधीवर आधारित हयात असेतोपर्यंत 08 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.असे योजनेचं वैशिष्ट असून प्रभागातील शेकडो नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला.दिव्यातील अनेक महिला वर्ग व नागरिक हे छोटे मोठे व्यवसायिक असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेत चा लाभ घ्यावा असे यावेळी मा.नगरसेविका सौ दर्शना चरणदास म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME